हिंगोली जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचा नागपूर अधिवेशनात मोर्चा

हिंगोली- केशव अवचार (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष फारुक पठाण यांच्या नेतृत्वात स्वस्त धान्य दुकानदारांच्या न्याय मागण्या मान्य करून घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून नागपूर येथील मोर्च्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले.
या मोर्चात जिल्हा संघटक शाहनवाज गौरी, अमान गौरी, हिंगोली खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक आसिफ गौरी इत्यादी सहभागी झाले आहेत.

राज्यातील सर्वसामान्य रेशनकार्ड धारकांची स्वस्त धान्य वितरण व्यवस्था टिकून मजबूत व्हावी. तसेच महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा हा मुख्य हेतू ठेवून रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्या, न्याय व हक्कांसाठी नागपूर येथील विधान भवनावर येत्या ११ डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढणार असल्याचा निर्णय बैठकीत घेतल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष गणपत डोळसे-पाटील यांनी दिली.

राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना सर्व योजनेंतर्गत रेशनपुरवठा व्हावा, कोविडसारख्या महामारीच्या काळात स्वतः सह संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात घालून संपूर्ण जग घरात बसून असताना रेशन दुकानदारांनी मात्र शासनाच्या विविध योजनांचे धान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्याची दखल शासनाने घ्यावी. महागाईचा उच्चांक झालेला असताना दुकानदार मात्र तुटपुंज्या कमिशनवर कुटुंबाची गुजरान करत आहे. परवानाधारकांना अन्नसुरक्षा अंतर्गत मार्जिन बँक खात्यात त्वरित वर्ग करावे, तसेच पॉस मशीन सर्व्हर पारंपरिक प्रशासकीय तांत्रिक अडचणी दूर करून अत्याधुनिक मशीनरी उपलब्ध करावी, आदीविषयी चर्चा झाली. परवानाधारक दुकानदारांचा केरोसीन व्यवसाय संपुष्टात आणून ५५ हजार कुटुंब रस्त्यावर आली. त्याची दखल शासनाने घेतली नसल्याची नाराजी व्यक्त व्यक्त होत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने