हिंगोली: हिंगोली शहरातील तसेच बाहेर गावातील काही ख्रिश्चन धर्म लोक आदिवासी, दलित आणि मागास जातीतील कुटुंबांना पैशाचे आमिष दाखवून, आजार बरे होण्याच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून त्यांचेवर ख्रिश्चन धर्म थोपवित आहेत. असाच प्रकार जांभरून आंध या गावात घडला असून या हे प्रकार थांबले नाहीत तर या धर्म प्रचारक आणि प्रसारकांना जशास तसे उत्तर देण्यात येईल असा निर्धार जांभरून आंध येथील तरुणांनी केला आहे. तसेच १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तरुणांनी जांभरुण आंध गावात मोर्चा काढून येशू ख्रिश्चन बंद करा, बंद करा... बिरसा मुंडा की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा देऊन गाव दणाणून सोडले.
![]() |
गावातील चौकात जमा झालेले तरुण... |
याबाबत हिंगोली येथील जांभरुण आंध येथील रामराव जुंबडे यांनी सांगितले की जांभरून आंध येथे दोन वर्षापासून हिंगोली शहरातील आणि काही ग्रामीण भागातील ख्रिश्चन धर्म प्रसारक प्रार्थनेचे नावाखाली गोरगरीब आदिवासी, दलित समाजातील लोकांना एकत्र करीत आहेत. जमा झालेल्या लोकांना असाध्य आजार केवळ प्रार्थना करुन दूर होतात, तसेच येशू ख्रिस्त धन संपत्ती देतो, पारंपारिक धर्माने तुमचे नुकसान केले आहे असे सांगत आहेत.
प्रत्येकाला आपापल्या धर्माचे आचरण, प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार आहे. परंतु अंधश्रद्धा पसरवून, पैशाचे आम्हीच दाखवून, आमच्या महापुरुषांबद्दल गैरसमज निर्माण करून, त्यांच्याविषयी द्वेष पसरवून जर कोणी धर्मांतर करीत असेल तर आम्ही सहन करणार नाहीत. आमच्या गावात गेल्या दोन वर्षांपासून असले प्रकार होत आहेत. भगवान बुद्ध आणि भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला, बहुजन समाजाला प्राकृतिक, वैज्ञानिक आणि निसर्ग धर्म दिला आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला किंवा बहुजन समाजाला इतर कोणत्याही धर्माची गरज नाही. असे असतानाही कोणी आमच्या भावनांशी कोणी खेळत असेल तर त्याला चोख उत्तर देण्यात येईल.-ॲड. रामराव जुंबडे, ग्रामस्थ, जांभरून आंध.
आदिवासी दलित समाजातील लोकांना पैसा आणि इतर सोयी सुविधांचे प्रलोभन दाखवून सुद्धा त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. जांभरुण आंध येथे आदिवासी आणि दलित समाजातील १० ते १५ कुटुंबांना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देण्यात आली आहे. तर ज्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे किंवा येशू ख्रिस्ताचे आराधना करणे सुरू केले आहे हे लोक गावातील इतर लोकांना सुद्धा ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवत आहेत. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी बाहेर गावाहून येणाऱ्या धर्मप्रचारकांना यापूर्वी सुद्धा गावात न येण्यासाठी आणि गोरगरीब लोकांना आमिष दाखवून धर्मांतर न करण्याबाबत विनंती केली. मात्र ख्रिश्चन धर्म प्रसारकांचे कार्य तसेच सुरू राहिले.
त्यामुळे आता गावातील तरुणांनी या प्रकाराला उत्तर देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार या तरुणांनी जांभरून अंध गावात मोर्चा काढून ख्रिस्ती धर्म प्रसारकांना इशारा दिला आहे, की यानंतर धर्मप्रसार असा सुरू राहिला तर त्यांना चोख उत्तर देण्यात येईल. तसेच या तरुणांनी गावातून गल्लीबोळात जाऊन मोर्चा काढत येशू ख्रिश्चन बंद करा, बंद करा, भगवान बिरसा मुंडा की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा देवुन गाव दणाणून सोडला होता.
हे आंदोलन ॲड. रामराव जुंबडे यांच्या नेतृत्वाखाली बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती प्रमुख संतोष गुव्हाडे, अबू गुव्हाडे, रमेश लिंबळकर, विठ्ठल माघाडे, रघुनाथ बेले, मोहन जुंबडे, गजानन निंबाळकर, अर्जुन जुंबडे दत्ता जुंबडे, विलास जुंबडे, सुभाष जुंबडे, सूरज जुंबडे, बबन गुव्हाडे, योगेश जुंबडे, सदानंद निंबाळकर, मधुकर बेले, जोतिराम कऱ्हाळे, जोतीराम जुंबडे, भगवान गुव्हाडे, आदिनाथ गुव्हाडे, भागवत गुव्हाडे, नवनाथ जुंबडे, समस्त जांभारून आंध यांच्या वतीने करण्यात आले.
Tags:
Anti-Christ Rally
Christian Conversation
Christian Religion
Jambharun Aandh
Jesus Christ
Tribal Religion Conversation
Yeshu Khrist
खुप खुप धन्यवाद साहेब
उत्तर द्याहटवा