आझाद समाज पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्षपदी प्रताप भुक्तर यांची निवड

हिंगोली: आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आझाद समाज पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी तरुण तडफदार कार्यकर्ते प्रताप भुक्तर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आझाद समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील वाकेकर, आझाद समाज पक्षाचे युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष अतुल बेळीकर आणि प्रदेश सचिव तथा जिल्हा प्रभारी ॲड. रावण धाबे यांच्या मान्यतेने आझाद समाज पक्षाचे जिल्हाप्रमुख ॲड. अभिजीतदादा खंदारे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
बैठकीत महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी अनिताताई भगत, जिल्हा संघटकपदी, रामदासभाई सोनवणे यांची सुद्धा निवड करण्यात आली. कार्यक्रमास, शहर प्रमुख राजरतन बगाटे, तालुका अध्यक्ष मेहबूब शेख, शहर कार्याध्यक्ष निशांत राऊत, आझाद समाज पार्टीचे अंबाळा गावचे उपसरपंच विशाल भिसे, मुस्लिम आघाडीचे संघटक शेख जाफर शेख इब्राहिम, तसेच युवा नेते शफी शेख, भीमराज खंदारे, शेख जाकीर, सय्यद साजिद, सय्यद जावेद, रघुनाथ बगाटे, विकास भुक्तार, सुनील घुगे काशीराम घुगे, युवा नेते नरेश रसाळ, इत्यादी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी प्रदेश सचिव तथा जिल्हा प्रभारी ॲड. रावण धाबे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाप्रमुख ॲड. अभिजीतदादा खंदारे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक रामदास सोनवणे यांनी केले. तर सूत्रसंचालन उपसरपंच विशाल भिसे यांनी केले. त्यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून, आझाद समाज पार्टीच्या ध्येय धोरणानुसार पक्षवाढीसाठी काम करण्याचे आश्वासन दिले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने