हिंगोली: माननीय चंद्रशेखर आझाद रावण यांचे नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टीच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश सचिव तथा हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी रावण धाबे यांच्या शिफारशीवरून ॲड. अभिजीत खंदारे यांची आज दि. 15 ऑक्टोबर 2023 रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.
![]() |
अॅड. अभिजीत खंदारे यांचे जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर स्वागत करण्यात आले. |
यानिमित्त शासकीय विश्राम घरात घेण्यात आलेल्या बैठकीला अध्यक्षस्थानी वाशिम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. बबन भगत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. राहुल उपस्थित होते. यावेळी सर्व संमतीने मतदानाच्या प्रक्रियेतून ॲड. अभिजीत खंदारे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीला नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष विश्वंभर पटवेकर, जिल्हा उपाध्यक्ष उद्धव सरतापे, शहर कार्याध्यक्ष निशांत राऊत, शहराध्यक्ष राजरत्न बगाटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य रामदास सोनवणे, तसेच हिंगोलीचे तालुकाध्यक्ष शेख मेहबूब, जिल्हा सचिव संतोष भोकरे, जिल्हा सचिव गौतम भगत, जिल्हा मीडिया प्रमुख नशीर शाह, कळमनुरीचे तालुकाध्यक्ष गौतम इंगोले, सुनील ठाकूर, शहर उपाध्यक्ष माधव शिंदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास सोनवणे, शेख शफी, मोहन जाधव व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे विश्वंभर पटवेकर आणि नाशीर शाह हे आजारी असतानाही त्यांनी बैठकीचे चांगले नियोजन करून बैठक यशस्वी केली. सुत्रसंचालन जेष्ठ नेते केशव अवचार यांनी केले. तर आभार शहर कार्याध्यक्ष निशांत राऊत यांनी केले.