सेनगाव/प्रतिनिधी:- सेनगाव तालुक्यातील बहुजन समाजाचे तरुण नेते ज्ञानेश्वर रंगनाथ कांबळे यांची आझाद समाज पार्टीच्या सेनगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे सेनगाव तालुक्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे
![]() |
ज्ञानेश्वर कांबळे |
आझाद समाज पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर आजाद रावण यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टीचे काम महाराष्ट्र राज्यात अति वेगाने चालू आहे. प्रदेश अध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर, प्रदेश सचिव ॲड. रावण धाबे हिंगोली यांच्या शिफारसीने, जिल्हाध्यक्ष ॲड. सुनील बगाटे यांनी ज्ञानेश्वर कांबळे यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली आहे. तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील असलेल्या योगदानाची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. आजाद समाज पार्टीकडून आपण कुशलतेने आपल्या पक्षाचे कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे व समतामुलक समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

त्यांची निवड झाल्याने त्यांचे स्वागत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बबन सुतार, सामाजिक कार्यकर्ते अश्रुबा खंदारे, किसन सोनुने, पत्रकार शेख फजल पुसेगावकर, पत्रकार जगन्नाथ पुरी, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर घनघाव, यासह समाज बांधव व विविध स्तरातून स्वागत केले जात आहे. हिंगोली येथे यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष विश्वंभर पटवेकर, जिल्हा उपाध्यक्ष उद्धव सरतापे, जिल्हा सचिव अमोल गायकवाड, हिंगोली तालुका कार्याध्यक्ष नितीन शिखरे, हिंगोलीचे शहराध्यक्ष निशांत राऊत आदी उपस्थित होते.