हिंगोली/कळमनुरी:- मणिपूर येथे मागील ०३ महिन्यापासून आदिवासी समाजावर होणाऱ्या हिंसाचार, अत्याचार व तसेच भारत देशाची मान शरमेने झुकेलेली आहे. तसेच आदिवासी 3 महिलांना नग्न करून धिंड काढली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आणि मणिपूर राज्यात आता पर्यंत 200 च्या जवळपास हत्या करण्यात आल्या. गावच्या गाव जाळली जात आहेत, तेथील हिंसाचार थांबवण्यास मणिपूर व केंद्रात असलेली जातीयवादी भाजपा सरकार थांबविण्यास तयार नाही इत्यादी बाबींच्या निषेर्धात भारतीय आदिवासी पँथर संघटना यांच्या वतीने प्रशांत बोडखे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यासाठी " आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये विविध संघटना व राजकीय पक्ष यांनी 'एकता रॅलीचे जाहिर पाठिंबा दिला असून त्यामध्ये किरणभाऊ घोंगडे प्रदेश अध्यक्ष रिपब्लीकन - सेना, ॲड. रावण धाबे प्रदेश अध्यक्ष आझाद समाज पार्टी, राम ढाकरे- जिल्हा अध्यक्ष रावण सेना, ॲड. सुनिल बगाटे जिल्हा अध्यक्ष आझाद समाज पार्टी, ॲड. - विजय राऊत जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ती पार्टी, बौध्द राष्ट्रसेना अध्यक्ष ॲड. अभिजीत खंदारे, ॲड. रामराव जुबडे, सामाजिक कार्यकर्ते, गजानन मुकाडे राज्य अध्यक्ष भारतीय आदिवासी पँथर कर्मचारी संघटना, सखाराम अंभोरे सचिव - भारतीय आदिवासी पॅथर कर्मचारी संघटना, तसेच क्रांतीवीर डोमाजी आंध आदिवासी सांस्कृतीक कला मंच उपस्थीत राहणार आहे. सदर एकता रॅली मध्ये हिंदु, मुस्लीम, बौध्द, शिख, ईसाई एकतेसाठी सर्व धर्माचे . धर्म गुरु उपस्थीत राहणार आहेत.
तसेच आझाद समाज पार्टी च्या वतीने केंद्र सरकार व मणिपूर सरकारच्या विरोधात "मुंडण करण्यात येणार आहे. तसेच सदर रॅलीची सुरुवात नगर परिषद उद्यान, लमानदेव कळमनुरी ते तहसिल कार्यालय, कळमनुरी येथे पोहचवून, केंद्र सरकार व मणिपूर येथील भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, नारेबाजी व भाषणे होतील.
तरी आपल्या दे. वृतपत्रांच्या माध्यमातून सदर मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने सर्व धर्मीय लोकांनी उपस्थीत राहण्याचे आव्हाण जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ पिंपरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Tags:
Adivasi Panther
Hingoli news
Kalamnuri Morcha
Manipur Incident
Tribal Kalamnuri Morcha
Tribal People