महाराष्ट्रात तिसरी आघाडी: २६ जून रोजी औरंगाबाद येथे चंद्रशेखर आझाद रावण यांची जाहिर सभा

हिंगोली: आगामी विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास समिती या तिसऱ्या राजकीय आघाडीची स्थापना करण्यात आली असून येत्या 26 जून 2023 रोजी औरंगाबाद येथे आमखास मैदानावर समितीची जाहिर सभा होणार असल्याची माहिती आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर यांनी येथे आज आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आज महाराष्ट्र विकास समितीचे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर, महाराष्ट्र विकास समितीचे प्रदेश अध्यक्ष ॲड. नंदेश अंबाडकर, प्रजा सुराज्य पार्टीचे दशरथ राऊत, महाराष्ट्र विकास समितीचे समन्वयक ॲड. अनिरुद्ध येचाळे, भटक्या जाती जमती ओबीसी संघाचे प्रमुख अशोक धनघावकर, आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव ॲड. रावण धाबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्राचार्य वाकेकर यांनी सांगितले की ॲड. अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विकास समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समितीच्या वतीने लढल्या जाणार आहेत. या समितीची जाहीर सभा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद येथे 26 जून 2023 रोजी आमखास मैदानावर होणार असून या सभेला आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर रावण आझाद आणि महाराष्ट्र विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील हे संबंधित करणार आहेत. 

यावेळी अनिरुद्ध येचाळे, नंदेश अंबाडकर, दशरथ राऊत, अशोक धनगावकर यांनीही महाराष्ट्र विकास समितीच्या ध्येयधोरण संदर्भात पत्रकारांना माहिती दिली. आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव ॲड रावण धाबे यांनी प्रास्ताविक केले. तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष ॲड. सुनील बगाटे यांनी केले. पत्रकार परिषदेसाठी आझाद समाज पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष ॲड. नितीन शिखरे, शहराध्यक्ष नाशेर शाह, औंढा तालुका अध्यक्ष सुनिल कीर्तने आदींनी परिश्रम घेतले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने