आझाद समाज पार्टीचे १५ मार्च रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन

हिंगोली: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्या अध्यक्षतेखालील आजाद समाज पार्टीचे १ ले राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्लीत सिरी फोर्ट ऑडिटोरियम या ठिकाणी दिनांक १५ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
आझाद समाज पार्टीची स्थापना १५ मार्च २०२० रोजी म्हणजेच बहुजन नेते मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीदिनी करण्यात आली आहे. पक्ष स्थापनेनंतर आजाद समाज पार्टीचे हे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाला पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आजाद रावण हे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला देशभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 

नवी दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियम या ठिकाणी १५ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील वाकेकर, तसेच प्रदेश मुख्य महासचिव मनीष साठे, महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड. रावण धाबे, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुनील बगाटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने