जागतिक आदिवासी दिनानिमित्त समाज प्रबोधन मेळावा

हिंगोली: आदिवासी युवक कल्याण संघ व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन छंदक लोखंडे ( प्रकल्प अधिकारी कळमनुरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ संतोष टारफे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष गणाजी बेले, जिल्हा परिषद चे सभापती बाजीराव जुमडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ.सतिष पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य रामराव वाघडव, दत्ता नांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर समाज प्रबोधन मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवव्याख्याते शंकर भारती हे आले . यावेळी शिवव्याख्याते शंकर भारती यांनी यांनी असे सांगितले की समाजातील तरुण मुला-मुलींनी शैक्षणिक क्षेत्रात जास्तीत जास्त लक्ष देऊन आपला आणि आपल्या समाजाचा सुद्धा विकास केला पाहिजे. आपल्याही आदिवासी बांधवातून जिल्हाधिकारी एसपी या दर्जाचे अधिकारी निर्माण झाले पाहिजे. तसेच समाजातील तरुणांनी आर्थिक व सामाजिक प्रगती केली पाहिजे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी महिला पुरुष मोठ्या संख्येने समाज प्रबोधन मेळाव्यासाठी आले होते.

या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते, बबन डुखरे, संजय काळे, मारोती बेले, शंकर शेळके, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता नांदे, नंदू वाईकर, नंदू कोकाटे, माधव कपाटे, बीरू आसोले, संभाजी गुहाडे, लक्ष्मण कुरूडे, परमेश्वर वाघतकर, आत्माराम वाघतकर, अशोक खोकले डॉ दत्ता खोखले, आनंता पिंपरे, संतोष खोखले, आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या