हिंगोली शहरात उभारला जाणार माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा- पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

उत्थित शिल्पातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख

हिंगोली: येथे सध्या इंदिरा चौकात असलेल्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येत आहे. या कामास मंजुरी देण्यात आली असुन, या वर्षी महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी त्याचे भुमिपुजनही केले आहे. लवकरच त्या ठिकाणी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा ब्रांझ धातूपासून बनवण्यात येतआहे. मुंबई येथील जगप्रख्यात जे जे स्कुल ॲाफ आर्टच्या शिल्पकारांकडून या पुतळयाच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन, लवकरच पुतळा उभा करण्यात येणार आहे. तसेच या पुतळा परिसरात मोर, व इतर सौंदर्यपुर्ण संकल्पनेचा वापर करुन सुशोभिकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिली.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारका समोरील पोस्ट ऑफिसच्या रस्त्याच्या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग अधोरेखित करणारी म्युरल वॅाल उभी करण्यात येत आहे. यावर चवदार तळ्याचा सत्याग्रह, बौध्द धर्माची दिक्षा आणि राज्य घटनेची प्रत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सोपवतानाचे क्षण उत्थित शिल्पाद्वारे चित्रित करण्यात येणार आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख उत्थित शिल्पातून होणार असुन, यामुळे हिंगोली शहराच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहितीही पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्थित शिल्पाचे काम लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या