आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने १० वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

हिंगोली: दहावीमध्ये चांगली टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचा आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंडित काच्छवे, तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार कल्याण देशमुख, आंबेडकर प्रेस कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रावण धाबे, पत्रकार मीडिया प्रमुख सुधाकर वाढवे, धुंडिराज पाठक, ॲड. अभिजीत खंदारे, ॲड. रामराव जुंबडे, विलास पंडित, दादाराव जुंबडे पाटील यांची उपस्थिती होती.  आरती दिगडे 91. 40 टक्के, अंजली जाधव 91 टक्के, वैशाली दिगडे 89 टक्के,  जयेश राठोड 86. 80 टक्के, धम्मपाल आवचार 84 टक्के, रोहित इंगोले 83 टक्के, दीपेश कापसे 77.80 टक्के, आदर्श अवचार 76 टक्के अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी आवर्जून कांचन धुळे, विशाखा काशीदे यांनी विशेष सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अभिजित खंदारे यांनी केले. तर आभार सुधाकर वाढवे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या