वसमत पंचायत समितीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

हिंगोली/बिभीषण जोशी- मंजूर झालेल्या घरकुलाचा तिसरा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना वसमतच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यास एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार वसमत पंचायत समिती तील आरोपी लोकसेवक ग्रामीण गृहनिर्माण अभियंता शेख समीर शेख खैसर यांनी तक्रादार यांच्याकडून घरकुलाचा तिसरा हप्ता बँक खात्यात टाकण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रादार यांनी लाच लुचपत विभागाकडे लाच मागितल्याची तक्रार २८डिसेंबर२०२१ रोजी दाखल केली होती. त्यानुसार। लाच लुचपत विभागाने ३१ डिसेंबर२०२१ रोजी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पस्ट झाले.

तर दुसरा आरोपी करीम कुरेशी शादुल्ला याने आरोपी शेख समीर यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने बुधवारी लाचलुचपत विभागाने सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक धर्मसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या