आंबेडकरवादी प्रवाहात येणार्‍या मातंग समाजावर हिंदुत्ववादी समुदायाकडून हल्ले- अ‍ॅड. रावण धाबे

हिंगोली- गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूत्ववादी विचारधारेपासून फारकत घेवून फुले-शाहू-आंबेडकरी विचार स्विकारणार्‍या मातंग समाजावर हिंदुत्ववादी समुदायाकडून हल्ले होत असून या जातीयवादी शक्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी बहूजन मजूर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. रावण धाबे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात मातंग समाजातील तरूणी आणि तीच्या वडीलांवर मनुवादी मानसिकता असलेल्या सवर्ण समाजातील व्यक्तींनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत आज बहूजन मजूर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, हिंगोली यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांना निषेध निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की धार्मिक गुलामगिरी झुगारून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेच्या मुख्य प्रवाहात हा समाज येत आहे. हीच बाब हिंदुत्ववादी आणि मनुवादी लोकांना सहन होत नाही. एक मोठा समूह गुलामगिरी सोडून स्वतंत्र विचार करीत असल्याची बाब मनुवादी समाजाला सहन होताना दिसत नाही. त्यामूळे पुढे जाणार्‍या मातंग समाजाला मागे खेचण्यासाठी जिवघेणे हल्ले करण्यात येत आहेत, असे रावण धाबे सांगितले. तसेच याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. या जातीयवादी लोकांचा बंदोबस्त करण्यात यावा, नसता राज्यभर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. रावण धाबे, मुख्य सल्लागार केशव अवचार, जिल्हा सचिव अ‍ॅड. सुनिल बगाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. रामराव जुंबडे, अ‍ॅड. नागेश सरनाईक यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या