हिंगणी येथील भिम जयंती प्रकरण: जातीयवादी मोकाट, आंबेडकरी समाजावर मात्र गुन्हे दाखल

हिंगोली/ बिभिषण जोशी: हिंगोली तालुक्याअंतर्गत येणाऱ्या हिंगणी या गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जंयती निमित्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावात सर्वप्रथम ध्वजारोहन करण्यात आले तसेच ग्रामस्थ व आंबेडकर प्रेमी जनतेला मिरवणूक शांततेत व कायदेशीर बाबींची पूर्तता करून जयंती काढण्यात आली. मात्र पोलिसांनी ही भिमजयंती मिरवणूक बेकायदेशीर ठरवून आंबेडकरी समाजावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्याउलट गावातून भिम जयंती काढण्यात येवू नये, असा बेकायदेशीर ठराव घेणार्‍या ग्रामसेवक, सरपंच, सूचक आणि इतर लोकांना मात्र पोलिसांनी मोकाट सोडल्याने संताप व्यक्त होत आहे. 
हिंगणी येथील जयंती मिरवणूक व झेंडा वंदन कार्यक्रमाला उपस्थित जनसमुदाय...

34 जणांवर गुन्हे दाखल, इतर 30 ते 40 जणांचाही गुन्ह्यात समावेश

याबाबत कळमनुरी पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सखाराम सोनुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिता राजकुमार सरतापे, राजकुमार गोविंदा सरतापे, किरण घोंगडे, बबन सखाराम दवणे, पांडुरंग सखाराम कोल्हे, किसन हरिभाऊ खंडागळे, गौतम जगन्नाथ सरतापे, विजय मारूती कोल्हे, लखन यशवंतराव सरतापे, बाळू कबीर खंडागळे, तथागत प्रताप पाईकराव, कौतिका किसन कोल्हे, प्रकाश हनवता हनवते, कमल सखाराम दवणे, पंडित चांदुजी दवणे, रत्नाकर जगन्नाथ सरतापे, वर्षा राजकुमार कोल्हे, राजकुमार सखाराम कोल्हे, वंदना त्र्यंबक खंडागळे, सुबोध बबन सरतापे, अमोल बबन खंदारे, अरविंद यशवंता सरतापे, संदीप सखाराम कोल्हे, प्रल्हाद भीमराव खंदारे, सुवर्णा प्रल्हाद खंदारे, रंजना रमेश दांडेकर, नंदाबाई भीमराव खंदारे, भीमराव निवृत्ती खंदारे, बबन निवृत्ती खंदारे, गयाबाई बबन खंदारे, मनीषा सुधाकर खंदारे, दीपक केरबा खंडागळे, भूषण पाईकराव व इतर 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी 27 जणांना 29 एप्रिल रोजी रात्री ताब्यात घेतले आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोयलावार हे करीत आहेत.


विरोधी लोकांवर गुन्हे दाखल होतील का?

हिंगणी येथील भीम जयंती जयंती प्रकरणी बौद्ध बांधवांच्या वतीने सुद्धा दि. 26 एप्रिल 2022 रोजी एक तक्रार देण्यात आली आहे. त्यामध्ये हिंगणी ग्रामपंचायतने जयंती न काढण्याबाबत बेकायदेशीर आणि जातीवादी स्वरूपाचा ठराव पारित केला असल्याने ग्रामसेवक, सरपंच, सूचक आणि ठराव घेणार्‍या ग्राम पंचायत सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु याबाबत अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. तर जयंती समारोहानंतर परतणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. दगडफेक प्रकरणी सुद्धा 29 एप्रिल 2022 रोजी एसपी राकेश कलासागर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
जयंतीच्या दिवशी हिंगणी गावात तैणात पोलिस बंदोबस्त...

भिम जयंती शांततेतच.....

29 एप्रिल 2022 रोजी भंते बुद्ध कीर्ती व भिकू संघ तसेच रिपाईचे मराठवाडा सरचिटणीस दिवाकर माने, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, बी.एम.पी.चे प्रदेशाध्यक्ष ॲड. रावण धाबे, भारतीय बौद्ध महासभेचे दिनेश हनुमंते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव रवींद्र वाढे, ज्योतिपाल रणवीर, यांच्यासह पत्रकार प्रकाश इंगोले, अ‍ॅड. अभिजीत खंदारे, वंदना शिंदे, प्रकाश कांबळे, मिलिंद कवाने, विनोद जोगदंड, भारत गडणे, सुनील ढोके, भूषण पाईकराव, बाळु गायकवाड, सचिन भिसे, अरुण कांबळे, रमेश इंगोले, सुरेश वाडे रामदास सोनवणे आदी प्रमुख पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत निळ्या ध्वजाचे रोहन करण्यात आले. त्यानंतर बहुतांश प्रमूख पाहूणे परत आले. नंतर दुपारी ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक गावच्या प्रमुख मार्गाने काढली. ही जयंती मिरवणूक शांततेत पार पडली. गावामध्ये दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षक राकेश कलासागर सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी आयोजन समितीच्या उपासिका अनिताबाई राजकुमार सरतापे , उपा. सुनिताबाई पांडुरंग कोल्हे , उपा. सुवर्णाबाई खंदारे , यमुनाबाई हनवते , वंदनाबाई खंडागळे , उपा . शंकुतलाबाई दवणे , पुष्पाबाई कोल्हे , उज्वलाबाई गौतम सरतापे , रंजना सरतापे , रंजनाबाई दांडेकर यांच्या सह सर्व भीम अनुयायांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या