डॉ. दीपक मोरे यांना आरोग्य भूषण पुरस्कार

हिंगोली- आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल न्यूज लाईन तर्फे सह्याद्री पुरस्काराचे आयोजन केले आहे. त्यानुसार डॉ. दीपक मोरे यांना आरोग्य भूषण पुरस्कार देऊन मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थित मुंबई येथे गौरव केला जाणार आहे.

न्यूज लाईन तर्फे सह्याद्री पुरस्कार २०२२ चे आयोजन केले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना सह्याद्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे. आरोग्य भूषण पुरस्कारासाठी या न्यूज लाईन संस्थेने हिंगोली येथील सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे यांची निवड केली आहे.

या पुरस्काराचे वितरण केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारतीताई पवार , राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स चे चेअरमन संदीप थोरात यांच्या हस्ते होणार आहे. तर विधानसभेचे उपसभापती नरहरी झिळवळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. दीपक मोरे यांना आरोग्य पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या