हिंगोली- सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बौद्ध भिक्खू आणि बौद्ध उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त मध्यप्रदेशातील आंबेडकर नगर - महू येथे रवाना झाले. त्यांना हिंगोली रेल्वे स्थानकावर निरोप देण्यात आला.
सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बुद्ध विहाराचे भंते बुद्धकीर्ती थेरो, प्रज्ञाशील, भदंत मुदितानंद, भंते महिंद्रबोधी यांच्यासह बौद्ध उपासक गंगाबाई कांबळे, अक्षय कांबळे, गौरव बहिरे, संघमित्रा कांबळे हे रवाना झाले आहेत. हिंगोली येथील रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सचिव दिवाकर माने, युवा नेते सुनील इंगोले, रमेश इंगोले, प्रभू ढोले, रामेश्वर सोनवणे यांनी त्यांना निरोप दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या