रस्त्यासाठी नागरिकांचा पालिकेला निवेदनाद्वारे इशारा

हिंगोली:- शहरातील शाहू नगर ,वैद्य नगर येथील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वेळा पालिकेला निवेदन देऊनही सिमेंट रस्ते ,सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्याची अद्याप व्यवस्था केली नाही.तातडीने रस्ते ,नाल्याची व्यवस्था न केल्यास नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा पालिकेला मंगळवारी निवेदनाद्वारे दिला आहे.
संग्रहीत छायाचित्र.. 

शहरातील शाहू नगर, वैद्य नगर, सम्राट नगर ,कुशीनगर, भाग्यनगर , भागात पालिकेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून नाल्या, रस्ते नसल्याने नागरिकांना गैर सोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या भागात जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय डासांचा प्रादुर्भाव यामुळे नागरिक वैतागले आहेत. यापूर्वी स्थानिक नगर सेवकांच्या माध्यमातून पालिकेला निवेदन देण्यात आले. तर आंदोलन करून देखील पालिकेने दुर्लक्ष केले आहे. आता या भागातील नागरिकांची हद्द संपली असून ,येणाऱ्या आठ दिवसात रस्त्याची व नाल्याची कामे सुरू न केल्यास पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड. रावण धाबे, लखन यादव, विनोद भालेराव, राजरत्न बगाटे, भगवान गायकवाड, बाबासाहेब वाढवे, गोपाल यादव ,किरण मोरे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या