सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या; आरोपीला अटक

सेनगाव:- तालुक्यातील गोरेगाव येथे सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. उजमा बेगम असे या महिलेचे नाव असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत शेख रफिक शेख गफुर रा. कळमनुरी यांनी फिर्याद दिली होती.

गोरेगाव पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेबाबत माहिती मिळाल्यावर कळमनुरी येथील मयताचे नातेवाईक मोठ्या प्रमाणामध्ये गोरेगाव येथे जमा झाले परिस्थितीचे भान लक्षात घेता गोरेगाव पोलिस ठाण्याच्या सपोनि श्री श्रीदेवी पाटील मॅडम यांनी सदर मयताचे नातेवाईक यांची ज्या आरोपी विषयी तक्रार आहे त्यांचा शोध संबंधाने पथक रवाना केले असता सदर गुन्ह्यातील आरोपी पैकी आरोपी नामे सय्यद एजाज सय्यद कासीम हा गोरेगाव परिसरात मिळून आल्याने त्यास व सय्यद चांद सय्यद कासिम हा विदर्भाकडे गेला असल्याची माहिती मिळाल्याने खात्रीशीर माहिती काढून सपोनि पाटील मॅडम यांनी राहुल गोटरे शंकर गायकवाड काशिनाथ शिंदे चालक भोईनर यांचे पथकामार्फत त्यास देखील अटक केली आहे सदर कारवाईमुळे मयताचे नातेवाईकांचे समाधान झाले असून त्यामुळे त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार झाला नाही सपोनि पाटील मॅडम यांनी चांगल्या प्रकारे सदर परिस्थिती हाताळल्याचे दिसून आले सदर प्रकरणांमध्ये सपोनि पाटील मॅडम सह जमादार राहुल गोटरे पोलीस नाईक काशिनाथ शिंदे शंकर गायकवाड राहुल महिंद्कर चालक भोईनर यांनी चांगली भूमिका बजावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या