मंडळ अधिकाऱ्यास दहा हजाराची लाच घेताना अटक

हिंगोली (बिभीषण जोशी)- ट्रॅक्टर व रेती चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याना दहा हजाराची लाच घेताना मंगळवारी (ता.८) लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
ट्रॅक्टरवर रेती चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी यातील मंडळ अधिकारी भांडेगाव ,कनेरगाव येथील श्रीकांत कोंडबा मदिलवार वय५६वर्ष यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजाराची मागणी केली होती. मात्र तक्रादाराने पैसे नसल्याचे कारण सांगत लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती यानंतर (ता.८) रोजी लाच लुचपत विभागाने पडताळणी केली .त्यानंतर तडजोडी अंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून यातील पहिला हप्ता १० हजार स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे ,अप्पर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निलेश सुरडकर, युनूस सिद्दीकी, रुद्रा कबाडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, योगिता अवचार, सुजित देशमुख, यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या