हिंगोली- येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. सदर आरोपी विरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर आरोपीला गोरेगाव पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून अटक केली आहे.
पोलीस स्टेशन गोरेगाव गुन्हा क्रमांक16/ 2022 कलम 354 (a), 452, 294 व इतर भादवि गुन्ह्यांमधील अटकेतील आरोपी नामे विजय रमेश भगत राहणार कानडखेडा हा वैद्यकीय तपासणी दरम्यान हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथून फरार झाल्याने त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा क्रमांक 57 / 2022 कलम 224 भादवि प्रमाणे दाखल झाला होता.
सदर आरोपी चा शोध कलासागर पोलीस अधीक्षक हिंगोली, यशवंत काळे अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली, यतीश देशमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर, विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली श्रीदेवी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोस्टे गोरेगाव यांनी पोस्ट गोरेगाव येथील पोलीस कर्मचारी राहुल गोटरे -पोह / 176 , काशिनाथ शिंदे - पोना / 330, शिवाजी शिंदे - पोना / 714, नवनाथ शिंदे - पोकॉ / ki155, अमोल जाधव - पोकॉ / 895, PC/73 महाले यांचे वेगवेगळे पथके तयार करुन त्यांना सदर फरार आरोपी शोध संबंधाने योग्य त्या सूचनेसह आदेशित करून रवाना केले.
सदर पथकातील कर्मचारी यांनी सदर फरार आरोप विविध ठिकाणी शोध घेतला असता सदर आरोपी नाशिक ग्रामीण हद्दीमधील सिन्नर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्याला सिन्नर येथून ताब्यात घेऊन पोस्ट हिंगोली शहर येथे आणून हजर केले.