हिंगोली- बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. अभिजित खंदारे यांची जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांनी केली आहे.
दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला बसपाचे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांच्यासह प्रदेश कार्यालयीन सचिव अभिजित मनवर, प्रदेश सचिव देवराव भगत, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रज्ञावंत मोरे, झोन प्रभारी रमेश भिसे पाटील, जिल्हा प्रभारी अॅड. सुनिल खंदारे यांची प्रमूख उपस्थिती होती. आगामी जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणूका समोर ठेवून कामाला लागण्याच्या सूचना यावेळी प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी दिल्या. तर अॅड. खंदारे यांनीही आगामी नगर परिषदा निवडणूका पुर्ण ताकदीनीशी लढण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद केले.