हिंगोली- राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (SRPF Jawan committed Suicide in hingoli) केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली आहे. दिनेश बाळासाहेब मूलगीर असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
आत्महत्या केलेल्या दिनेश मुलगिर यांची हिंगोली येथील राज्य राखीव बल गट क्रमांक 12 मध्ये नेमणूक होती. ते गडचिरोलीतील राजाराम खंडाला येथे कर्तव्य बजावत होते. मागील पाच दिवसापूर्वी ते सुट्टीवर गावी परतले होते. आज दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी पहाटे 9 च्या सुमारास त्यांचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येचे कारण अजून समजले नाही.
याबाबत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती बाळापूर पोलीस ठाण्यातून मिळाली. त्याच्या पश्चाताप आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. सदर जवानाने त्याच्या कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत अधिक तपास आखाडा बाळापूर पोलीस करीत आहेत.
0 टिप्पण्या
We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe