Watch Uncut VIDEO हिंगोलीत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न: पहा संपुर्ण अनकट व्हीडीओ.....

हिंगोली- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका 35 वर्षीय तरूणाने तुकडेबंदी कायद्याची सेनगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून पायमल्ली होत असल्याने संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मानवी हक्क संघटन, दिल्ली या संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले मिलिंद प्रधान असे या तरूणाचे नाव आहे. आज सकाळी 9 वाजता पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यावर पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून जाताच हा तरूण अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अवतरला आणि सोबत आणलेला डिझेलचा डब्बा अंगावर ओतला. एका हाताने खिशातील माचीसची डब्बी काढण्याचा प्रयत्न करताच उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी सदर तरूणाला ताब्यात घेत त्याला आत्मदहनापासून प्रावृत्त केले. याबाबत हिंगोली पोलिस ठाण्यात मानवी हक्क संघटन, दिल्ली या संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले मिलिंद प्रधान यांचेवर आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी भादंविच्या कलम 309 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या