हरिभाऊ इंगोले यांचे निधन

हिंगोली- तालुक्यातील पळसोना येथील हरीभाऊ इंगोले यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. त्यांचे वय 65 वर्षे होते.
पळसोना येथील जेष्ठ नागरीक असलेले हरीभाऊ इंगोले हे सामाजिक कामात नेहमीच पुढाकार घेत. त्यांच्या प्रेमळ स्वाभावामूळे त्यांच्या निधनाबाद्दल हळहळ व्यक्त होत आहे. उद्या दि. 06 जानेवारी 2022 रोजी पळसोना येथे सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. ते पळसोना येथील उपसरपंच शिवाजी इंगोले यांचे वडील होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या