Law and Justice: खूनाच्या गुन्ह्यात तिघांची निर्दोष मुक्तता

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील नवविवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह तिघा जणांची निर्दोष मुक्तता येथील सत्र न्यायालयाने केली आहे. पुंजा लक्ष्मण चेपूरवार असे मयताचे नाव आहे. 2014 मध्ये तीचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही वर्षातच तीचा जळून मृत्यू झाला.
याबाबत मयताच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती लक्ष्मण चेपूरवार आणि दीर संजय चेपूरवार आणि शंकर चेपूरवार यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम 302, 498 अ, 34 नुसार स्टेशनरीचे दुकान टाकण्यासाठी माहेराहून 50 हजार घेवून येण्याच्या मागणीसाठी छळ करुन खून केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपपत्र येथील सत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर सुरू झालेल्या खटल्यात आरोपीतर्फे अ‍ॅड. एम. एम. मोरे, अ‍ॅड. के.पी. जोंधळे यांच्यासह अ‍ॅड. रावण धाबे, अ‍ॅड. मधूकर इंचेकर, अ‍ॅड. सुनिल बगाटे यांनी काम पाहिले. हा निकाल हिंगोली येथील सत्र न्यायाधिश के.जी. पालदेवार यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या