श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने कार्यक्रम

पुसेगाव- हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळ आणि बंजारा बांधवांच्या वतीने कार्यक्रम होणार आहे. पुसेगाव, जांभरून भागातील श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. त्यामूळे नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी दरवर्षी येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी होणार्‍या या कार्यक्रमाला श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गंगाराम खुडे, उपाध्यक्ष तथा पुजारी चंपती जुंबडे, सचिव नामदेव मोरे, सहसचिव भिवराबाई खुडे, महादू जुंबडे, शामराव खुडे, रामराव खुडे, खंडूजी खुडे, विठ्ठल खुडे, बालाजी खुडे आणि विलास खुडे हे विश्वस्थ प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमात अनेक बंजारा बांधव हे नवस फेडत असतात. तसेच येणारे नविन वर्ष चांगले आणि सुख समृद्धीचे जावो यासाठी ज्योतीबाकडे साकडे घालतात. या कार्यक्रमाला पुसेगाव, जांभरून आंध, हनकदरी, खिल्लार, आडोळ, जांभरून तांडा, वडचूना आदी भागातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ज्योतीबा आदिमाय शक्ती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या