Suicide by Newly Married Couple: माहेरी न जावू दिल्याने पत्नीची आत्महत्या; नंतर पतीनेही उचलले हे पाऊल....

रागामूळे एकाच वर्षात संपला संसार; पती-पत्नीने एकमेकांना समजून घेतले असते तर......   

हिंगोली: भाऊबीजेसाठी माहेरी जाण्यास पतीने विरोध केल्याने पत्नीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रागाच्या भरात पत्नीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याने मानसिकरित्या हादरून गेलेल्या पतीने विरह सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने हिंगोली जिल्ह्यात एकच सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे 4 व 5 नोव्हेंबर रोजी घडली.
मयत काजल. (पती भिमरावचा फोटो मिळू शकला नाही)
Newly married couple commits suicide in Hingoli district at Potra village, Kalamnuri tehisl on the eve of Bhaubeej day of Deewali festival. The names of the deceased are, Kajal Sonu alias Bhimrao Ghogare (Age 20) and Sonu alias Bhimrao Rama Ghogare (age 22). The incident happened in the feat of uncontrolled anger and emotional ties.  
काजल सोनू उर्फ भीमराव घोगरे (२०) सोनू उर्फ भीमराव रामा घोगरे (२२) अशी मयतांची नावे आहेत. काजल आणि सोनू चे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर आणि कोरोना रोग कमी झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी असल्याने काजलने माहेरी पाठविण्याची विनंती केली. पतीने विनंती न मानता विरोध केल्याने काजलला राग सहन झाला नाही आणि तिने रागाच्या भरात थेट घरातच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने पती सोनू उर्फ भीमराव हा चांगलाच हादरून गेला. पत्नीच्या आत्महत्येनंतर सोनू घरी न आल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध केली असता, त्याचा मृतदेह शेतात आढळून आला. पत्नीच्या विरहातून  त्याने आत्महत्या केली असल्याचे समजते. केवळ रागाच्या भरात, आणि एकमेकांच्या भावना समजून न घेतल्याने काही क्षणातच होत्याचे नव्हते झाल्याने दोन्ही कुटूंबात सूतकी वातवरण पसरले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या