Jai Bhim Cinema Review in Marathi: जय भीम सिनेमा.... कायदा म्हणजे अन्यायाच्या विरोधातील एक निर्णायक ‘भीम’ अस्त्र

चोरी झाली, दरोडा पडला की पारद्याला हातकड्या. मग त्याचा अनन्वित छळ आणि त्या छळातून मग त्याचा मृत्यू. कधी कस्टडीत, तर कधी सुटका झाल्यावर मृत्यू, खून. असले चित्र महाराष्ट्रात अनेकांनी पाहिले असेल, वाचले असेल. अशीच काहीशी स्थिती स्वातंत्र्यापुर्वीच्या काळात केवळ जातीच्या आधारावर गुन्हेगार ठरविण्यात आलेल्या अनेक जातींच्या वाट्याला आजही आलेली आहे. कारण भारताचे जे काही नुकसान झालेले आहे, त्याला बहुतांशी जबाबदार हीच जाती व्यवस्था आहे, जी की आजही राजकीय, प्रशासकीय पातळीवर मनुवादी व्यवस्थेने पोसली आहे. त्यातून आदिवासी समाजाच्या वाट्याला आलेली जिवंतपणाची मरणयातना दाखविणारा सिनेमा म्हणजेच, जय भीम. हा केवळ सिनेमा नव्हे तर, सत्य घटनेवर आधारीत, आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढला गेलेला प्रदिर्घ असा न्यायालयीन लढा आहे, म्हणजेच एक ‘अलमोस्ट क्लोज टू डॉक्यूमेंटरी’ आहे.
तमील भाषेत रिलीज झालेला हा सिनेमा आता डब होवून भारतातील इतर भाषेतही आला आहे. हिंदी भाषेतील डब सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईमवर आता उपलब्ध आहे. आपण जर केवळ करमणूक करण्यासाठी हा सिनेमा असाल तर आपला भ्रमनिराश होईल. कारण, यात ना लव्ह स्टोरी आहे ना, रोमांस सीन. उच्चवर्णीय समाजाची बटीक झालेली जुनाट भारतीय पोलिस यंत्रणा, केवळ खालच्या जातीचा आहे म्हणून जिवंतपणीच मृत्यू दाखविणारी जातीवादी समाज व्यवस्था आणि हे सर्व पाहतांना अंगावर काटा आनणारे सीन, अन्यायाच्या विरोधात प्रचंड चिड निर्माण करणारे दृश्य, उकृष्ट संवाद आणि त्यात अभिनयातील सहजपण, नैसर्गिकपणा यामूळे हा सिनेमा अत्यंत सरस ठरला आहे. कायद्याचा अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, वकील आणि न्यायप्रीय व्यक्तीने हा सिनेमा पहावा असाच आहे. या चित्रपटात न्यायालयात चालते तसे वास्तविक कामकाज दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा प्रयत्न जवळपास यशस्वी झाला आहे.
Jai Bhim is the Indian Tamil-language legal drama film directed by T. J. Gnanavel and produced by 2D Entertainment- the production company owed by actor Suriya. And the film stars Suriya, with Prakash Raj, Rajisha Vijayan, Lijomol Jose, Rao Ramesh and K. Manikandan in supporting roles. Based on a true incident in 1993, which involves a case fought by Justice K Chandru, it follows Senggeni and Rajakannu, a couple from the Irular tribe. Rajakannu was convicted by the police, and was later missing from the police station. Senggeni seeks the help of an advocate Chandru to seek justice for her husband. Advocate Chandru is an Ambedkarite one and believes in the thoughts of Dr. Babasaheb Ambedkar, Ramasammi Periyar and Karl Marx.
1993 मध्ये इरूरल या आदिवासी जमातीतील राजाकन्नू नावाच्या इसमावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल होतो. मरण स्विकारेन परंतू चोरीचा कलंक लावून घेणार नाही अशी राजाकन्नूने बांधलेली खूनगाठ, खोट्या गुन्ह्याची कबूली देण्यासाठी पोलिसांकडून त्याच्यावर करण्यात आलेले अत्याचार आणि त्यातच मृत्यू. नंतर हा कोठडीतील मृत्यू नसून कारागृहातून फरार होताना अपघातात मृत्यू झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिसांचा आटापीटा. तर न्यायासाठी लढणारी त्याची पत्नी सेंगणी. आणि तो लढा यशस्वी करणारे वकील के. चंद्रू.

समाज व्यवस्थेत सोयीनुसार गांधी, नेहरू दिसतात. आंबेडकर का दिसत नाहीत? हा सिनेमाच्या सुरूवातीलाच वकील चंद्रू यांनी विचारलेला प्रश्न सिनेमा पुढे घेवून जातो. आणि आंबेडकर म्हणजे केवळ एका व्यक्तीचे, महापुरूषाचे नाव नव्हे. जय भीम म्हणजे केवळ जय घोष नव्हे, तर जय भीम म्हणजे अन्यायाविरोधात केलेले बंड आहे, लढा आहे हे दाखवून देते. ज्यावेळी सर्व मार्ग बंद होतात, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा, म्हणजे ‘भीम अस्त्र’च कामी येते ही बाब पदोपदी दाखविली जाते. सुरीया आणि ज्योथीका यांची निर्मीती असलेला या सिनेमात स्वतः सुरीया, लिजोमोल जोस, रजीसा विजयन, प्रकाश राज, के. मनिकंदन आदी कलावंतांनी जीव ओतून काम केले आहे. त्यामूळे हा सिनेमा पाहिल्यानंतर आपण प्रत्यक्ष घटनेचे साक्षिदारच झालो होतो असे वाटते. त्यामूळे निवांत वेळी सहकुटूंब, मित्र परिवारासह हा सिनेमा एकदा पहावा असाच आहे.
‌‌‌---अ‍ॅड. रावण धाबे, हिंगोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या