अ‍ॅड. स्वप्नील जी. मुळे यांच्या कवितेची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यामध्ये निवड

औंढा नागनाथ: येथील दिवानी व फौजदारी न्यायालयातील अ‍ॅड. स्वप्नील जी. मुळे यांच्या 'इन्फेक्शन' या कवीतेची नाशिक येथे 3 ते 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'कवी कट्टा' मंचावर कविता सादरीकणासाठी आयोजकांतर्फे निवड करण्यात आली आहे.
संपुर्ण महाराष्ट्रभरातून कवि कट्टासाठी कविता आल्या होत्या. त्यात निवडक कवितांमध्ये अ‍ॅड. मुळे यांच्या कवितेची निवड करण्यात आल्याचे संयोजन समितीकडुन कळविण्यात आले. 'इन्फेक्शन' कवितेच्या माध्यमातून अ‍ॅड. मुळे यांनी वृद्धावस्थेत मुलांकडून आई वडिलांची होणारी कुचंबना मांडली आहे. यापुर्वी यवतमाळ येथे पार पडलेल्या 92 व्या संमेलनातही अ‍ॅड. मुळे यांच्या कवितेची निवड झाली होती. पुन्हा निवड झाल्याबद्दल प्राध्यापक, वकिल व विविध क्षेत्रातील मंडळींनी  मुळे यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या