हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा...

भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

हिंगोली/बिभीषण जोशी: जिल्ह्यात सर्रासपणे खुले आम अवेध्य धंदे सुरू असून हे धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन निष्क्रिय ठरत आहे. त्यामुळे अवेध्य धंदे बंद करण्याची मागणी आमदार तानाजी मुटकुळे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे केलेल्या निवेदनात नमूद केले की, जिल्ह्यात खुलेआम सर्रासपणे मटका, जुगार, क्लब, अवेध्य वाळू वाहतूक तसेच अवेध्य दारू वाहतूक खुले आम सुरू असताना याकडे पोलीस प्रशासन हप्ते घेऊन कारवाई करीत नाही. पोलीस अधिकारी आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. त्यामुळे कारवाई तर लांबच राहिली आपले फावले करून घेत आहेत. 
हिंगोली जिल्ह्यात अवैद्य धंदे कोण चालवत आहे, कोणाकोणाचे मटका बुकी, जुगाराचे अड्डे आहेत? याबाबतची माहिती मात्र आमदार मुटकुळे यांनी उघड केली नाही. कोणत्याही धंद्याची तक्रार करत असताना त्यामध्ये त्या तक्रारीबाबत सत्यस्थिती दर्शवणारी, वास्तविक माहिती दिल्यास पोलिसांना सुद्धा कारवाई करणे सोपे जाते. हिंगोली जिल्ह्यात कोणकोणते लोकप्रतिनिधी कोणते अवैध धंदे चालवितात याबाबत सांगण्याची गरज नसली तरी अशा प्रकारची तक्रार करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मात्र पुराव्यानिशी तक्रार केल्यास त्यांनी केलेली तक्रार लोकहिताची आहे, हे स्पष्ट होते. नाहीतर या तक्रारीतून आपलेच हीत तर साध्य करण्यासाठी ही तक्रार केली नाही ना? या शंकेला सुद्धा वाव मिळत असतो. विशेष म्हणजे यापूर्वीही मुटकुळे यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण केले होते.
अनेक वेळा नांदेडच्या आयजीच्या पथकाने बाळापूर व हिंगोली परिसरात धाडी मारून हिंगोली पोलिसांचे पितळ उघडे पाडले. तरी देखील हिंगोली पोलीस अवेध्य धंद्याकडे डोळेझाक करून अवेध्य धंद्ये वाल्याना पाठीशी घालत आहे. या धंद्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या कडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील अवेध्य धंदे तातडीने बंद करण्याची मागणी आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या