ठार झालेला नक्षली मिलींद तेलतुंबडेमूळेच झाले होते बाळासाहेब आंबेडकर टार्गेट....

एल्गार परिषदेचे झाले होते निमित्त; जाणून घ्या कोण होता मिलिंद तेलतुंबडे

गडचिरोली जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत शिरावर तब्बल 50 लाख रुपयांचा इनाम असलेला माओवादी नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी ठार झाला. ठार झालेल्या या नेत्यामूळेच वंचित बहूजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर पुणे येथील एल्गार परिषदेच्या निमित्ताने शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून टीका होत होती. त्याचे कारण म्हणजे, मिलिंद तेलतुंबडे हा बाळासाहेब आंबेडकर यांचे मेहूणे आनंद तेलतुंबडे यांचा सख्खा भाऊ आहे.
मिलिंद तेलतुंबडे ठार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी या वृत्ताला पोलीस विभागामार्फत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल 26 नक्षलवाद्यांना ठार केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, मिलिंद तेलतुबंडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा छोटा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा मुळचा वणी येथील असून मागील कित्येत वर्षांपासून तो नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय आहे. तेलतुंबडे याने भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम केलेले आहे.

2017 मध्ये पुणे येथे एल्गार परिषद घेण्यात आली होती. या परिषदेला बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली होती. परंतू नंतर घडलेल्या भीमा कोरेगाव दंगलीनंतर बाळासाहेब आंबेडकर यांचे मेव्हूने आनंद तेलतुंबडे यांचेवर कथीत शहरी नक्षल्यांच्या मदतीने दंगल भडकावल्याबद्दल आरोप झाले होते. तसेच त्यांचेवर गुन्हाही दाखल झाला होता. बाळासाहेब आंबेडकर हे विरोधकांचे टार्गेट होण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे नक्षली मिलींद तेलतुंबडे हा नक्षली कमांडर होता. मिलिंद तेलतुंबडे हा बाळासाहेब आंबेडकर यांचे मेहूणे आनंद तेलतुंबडे यांचा सख्खा भाऊ आहे. आनंद तेलतुंबडे यांचा विवाह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात तथा वंचित बहूजन आघाडीचे प्रमूख बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांची बहीन रमाबाई यांच्याशी झाला आहे. आनंद तेलतुंबडे हे प्रसिद्ध विचारवंत असून त्यांनी डावी विचारसरणी, मार्क्सवाद, नव आंबेडकरवाद आदी विषयांवर लेखन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या