The Great Raavan: हिंगोलीच्या रावण दहन मैदानाला ‘राजा रावण मैदान’ असे नाव देण्याची मागणी

रावण दहनविरोधात जिल्हाधिकारी पापळकर यांना निवेदन

हिंगोली- परंपरेच्या नावाखाली दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी भारतातील आदिवासी बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या महाप्रतापी राजा रावणाचे दहन केले जाते. ही अत्यंत कुप्रथा असून ती त्वरीत थांबविण्यात यावी, हिंगोलीच्या रावण दहन मैदानाला राजा रावण मैदान असे नाव देण्यात यावे, रावण दहन करणार्‍यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात यावेत या इतर मागण्या जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेवून आज दि. 13 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आल्या. (Raavan Dahan opposed in Hingoli by Raavan lovers.)
याबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार, विजयादशमीच्या दिवशी आदिवासींचा आदर्श राजा रावण यांच्या पुतळ्याचे दहन केले जाते. ही बाब आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारी आहे. राजा रावण हे आदिवासी समाजाचे कुलदैवत असून राजा रावण यांची तामिळनाडू राज्यात 335 मंदिरे आहेत. मेघनाथ, मैशासूर, कुंभकर्ण, शुर्पनखा यांचीही पुजा केली जाते. असे असतानाही राजा रावण यांना राक्षस संबोधून समाजाच्या मनात चुकीची प्रतिमा निर्माण केली जाते. आदिवासी बहुजन समाजाच्या भावना दुखावणार्‍या या घटना असून हिंगोली दसरा समितीच्या वतीने रावण दहन करण्यात येवू नये, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकारी पापळकर यांचीही भेट घेण्यात आली.
The Ravana lovers in Hingoli have demanded to stop the Ravan Dahan programme which is being celebrated in the name of a religious custom and glorification of King Rama. Memorandum had been handed over to district collector Mr. Jitendra Papalkar in this regard today. Raavan lovers also demanded to rename to dussehara grounds after Emperor Raavan as "Raja Raavan Maidan". Other demands also pressed along with the memorandum. The district collector also took note of demands and assured to fulfill them according to the law.
यावेळी रावण दहन ही कुप्रथा असून ती त्वरीत थांबविण्यात यावी, हिंगोलीच्या रावण दहन मैदानाला राजा रावण मैदान असे नाव देण्यात यावे, रावण दहन करणार्‍यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात यावेत, रावण मैदानावर राजा रावणाची पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशा मागण्या जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचेकडे करण्यात आल्या. यावेळी आदिवासी पॅथर संघटनेचे प्रमूख प्रशांत बोडखे, आझाद समाज पार्टिचे जिल्हाप्रमूख अ‍ॅड. रावण धाबे, अ‍ॅड. अभीजित खंदारे, रावण साम्राज्य ग्रूपचे प्रमूख सुखदेव कोकाटे, उपाध्यक्ष राम ढाकरे यांच्यासह अनेक रावण प्रेमी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजा रावण अमर रहे, सम्राट रावण यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या