VIDEO परिवर्तनाची नांदी: वाई येथे रावण दहन नव्हे तर, राजा रावण सन्मान सोहळा उत्साहात

हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील वाई येथे आज विजयादशमी निमीत्त भारतीय आदिवासी पँथर संघटनेच्या सम्राट रावण सन्मान सोहळा घेण्यात आला. वर्षानुवर्षे अपमान होणाऱ्या आपल्या राजाचा सन्मान करणारा हा क्रांतिकारी कार्यक्रम म्हणजे खरा इतिहास अनुकरण करण्याची नांदी समजला जात आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. हरिभाऊ दुभाळकर हे होते. तर यावेळी आदिवासी पँथर संघटनेचे प्रमुख प्रशांत बोडखे, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रावण धाबे, ॲड. अभिजित खंदारे, दत्तात्रय नाईक, गोविंदा ढाकरे, ज्ञानेश्वर काठमोडे, गजानन मुकाडे, सरपंच विलास मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदिवासी पँथर संघटनेचे बोडखे, ॲड. धाबे, ॲड. खंदारे, ह.भ. प. भागोराव शिरडे महाराज आदींची भाषणे झाली. राजा रावण यांचे कार्य आणि चरित्रावर यावेळी वक्त्यांनी प्रकाश टाकण्यात आला. 
यावेळी राजा रावण यांच्या प्रतिमेचे उपस्थित नागरिक आणि महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी राजा रावण अमर रहे, आदिवासी राजा रावण यांचा विजय असो, बिरसा मुंडा यांचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे गावातील वातावरण रावणमय झाले होते. तसेच यावेळी गावकऱ्यांनी यानंतर आपले दैवत असलेल्या राजा रावण यांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. कार्यक्रमाला वाई आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे आयोजन वाई येथील आदिवासी कला संच ग्रुप, गजानन मुकाडे, पंजाब ढाकरे, कार्तिक मुकाडे, सुमित साबळे, विकास गुहाडे, रघुनाथ मुकाडे, कैलास मुकाडे, गणपत मारकळ, दादाराव धनवे, शिवम धनवे व समस्त गावकरी मंडळी यांनी केले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या