VIDEO: आमदार नवघरे यांचा पांचटपणा: घोड्यावर उभे राहून केली घोडचूक....

शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढून घातला शिवरायांना हार


बिभीषण जोशी/हिंगोली:- छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा वसमत शहरात दाखल होताच श्रेय लाटण्यासाठी गेलेले वसमत येथील आमदार राजू नवघरे यांनी चक्क महाराजांच्या घोड्यावर चढून पुष्पहार घालताना चूक केल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वसमत येथे शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. हा पुतळा बुधवारी राजस्थान येथून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा औंढा मार्गे वसमत येथे आल्यानंतर सर्व पक्षीय असलेल्या पुतळा समितीने जल्लोषात स्वागत केले. यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर श्रेय लाटण्यासाठी आलेले वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी चक्क चुकीच्या पद्धतीने महाराजांच्या घोड्यावर चढून हार घालण्यासाठी धडपड करीत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली आहे.

त्यानंतर त्यांनी माझी चूक झाली असून माफी देखील मागितली आहे. हार घालण्यासाठी एवढी धडपड का असा सवाल ही उपस्थित नागरिकांतून केला जात आहे. आधी चूक करायची आणि नंतर माफी मागायची ही तर नेत्यांची स्टाईल बनली आहे. या पांचट प्रकारामुळे वसमत तालुक्यात शिवप्रेमीकडून संतापाची लाट उसळली आहे. श्रेय लाटण्याची घोडचूक आमदारांच्या अंगलट आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या