अबब.... ९ महिन्यात ४२ हजार वाहन चालकाकडून २ कोटी रुपयांचा दंड वसूल

वाहतूक शाखेची कारवाई; पीआय चंद्रशेखर कदम यांची माहिती

हिंगोली/बिभीषण जोशी: शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस विभागाने ठिकठिकाणी तपासणी करून गाडी चालकांकडून नऊ महिन्यांत दोन कोटी रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून गाड्या चोरीच्या घटना घडल्या असून त्याचा शोध लागावा व रस्त्यावर दुर्घटना झाल्यानंतर गाडी चालकाचे नाव कळावे म्हणून शहर वाहतूक शाखेकडून एक जानेवारी ते सप्टेंबर अखेर शहरात ठिकठिकाणी तपासणी नाके तयार करून ४२ हजार ३५ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक कोटी पंच्याहत्तर लाख अकरा हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे .

शहरात अतिवेगाने गाड्या चालवून कर्कश आवाज करणे, ट्रिपलसीट बसून नेणे, गाड्या मॉडिफिकेशन करणे, वाहनावर मोबाइलवर बोलणे, राँगसाइड चालने, आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे . जिल्ह्यातील नागरिकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करून आपले वाहन चालवावे अन्यथा तपासणीत त्रुटी आढळून आल्यास योग्यरीतीने कारवाई करण्यात येईल असे कदम यांनी सांगितले.
पालकांनी मुलाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय हातात दुचाकी देऊ नये, तसेच सर्व वाहनाचे कागदपत्रे असल्याशिवाय वाहन चालविण्यास देऊ नये ,वाहन दिल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कारवाई करून दंड आकारण्यात येईल. --- चंद्रशेखर कदम, वाहतूक नियंत्रक शाखा, पोलीस निरीक्षक
याचबरोबर नागरिकांनी वाहतूक पोलीस शाखेच्या पथकाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी केली आहे .शहर वाहतूक शाखेच्या पथकातील कर्तव्यदक्ष कर्मचारी रावसाहेब घुमणर, किरण चव्हाण, शेषराव राठोड, चंद्रकांत मोठे , फुलाजी सावळे , संजय चव्हाण, वसंत चव्हाण, रवी गंगावणे, गजानन राठोड, सुभाष घुगे , शिवाजी पारसकर, बळीराम शिंदे, अमितकुमार मोडक , गजानन राठोड, सुषमा वाटेगावकर, तानाजी खोकले , गजानन सांगळे , रमेश ढोके, भारती दळवे, कैलास घुगे, चंद्रशेखर काशिदे, या पथकाने मागील नऊ महिन्यांपासून शहरातील ठिकठिकाणी तपास नाक्यावर रात्रंदिवस तपासणीचे काम करू आपले कर्तव्य बजावत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या