रिसोड पोलिसांनी पकडला ३ कोटी ४५ लाखांचा गांजा

रिसोड/बबन सुतार: कोट्यवधी रुपयांचा गाजा जात असल्याची गोपनीय माहितीच्या आधारावर रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकर यांनी आज 18 ऑक्टोबर रोजी रिसोड हिंगोली मार्गावर तीन ठिकाणी सापळा रचला एक आयशरातून तब्बल अकरा क्विंटल 50 किलो गांजा जप्त केला जप्त केलेल्या गांजा ची किंमत तीन कोटी 45 लाख रुपये असून 20 लाख रुपयाचे वाहन सुद्धा जप्त केले.
जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत तीन कोटी 65 लाख रुपये असून यात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड पोलीस स्टेशनला हिंगोली जिल्ह्यातून बुलढाणा जिल्हा कडे रिसोड मार्गे गांजा जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशावरून ठाणेदार नवलकर यांनी आपल्या पोलिस ताफ्यासह रिसोड हिंगोली मार्गावरील शाहि धाब्याजवळ आयशर ला अडविले असता त्यातून कोंबडीचे खाद्य च्या आड गांजा तस्करी होत असल्याची उघड झाले वाहन चालका कडे बिल्टी सुद्धा आढळून आली मात्र ठाणेदार नवलकर यांनी गांजा तस्करी चे पितळ उघडे केले. 

सदर कारवाईत 1) गोटीराम गुरुदयाल साबळे वय 52 वर्ष रा कुऱ्हा ता मोताळा2) सिद्धार्थ भिकाजी गवांदे रा निमगाव ता नांदुरा3) प्रवीण सुपडा चव्हाण रा हनवतखेड ता मोताळा4) संदीप सुपडा चव्हाण रा हनवतखेड ता मोताळा सर्व जि बुलडाणा या चारही आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली या कारवाईत ठाणेदार नवलकर यांच्यासह पो उप नि संतोष नेमणार,psi शिल्पा सुरगडे,HC अनिल कातडे, Npc रंजवे,भागवत कष्टे,सुशील इंगळे,गुरुदेव वानखडे, यांनी सहभाग नोंदविला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या