Google Pixel 6 and Google Pixel 6 Pro: 19 ऑक्टोबर रोजी येत आहे आयफोनला आव्हान देणारा गूगलचा पॉवरफूल पिक्सेल फोन...

ब्लॅकबेरी (BlackBerry) आणि विंडोज (Windows) मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम (Operating System- OS) लुप्त झाल्यानंतर जगात सध्या दोनच मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम कार्यरत आहेत, ज्या की स्मार्टफोनला चालवितात. त्यामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी गूगलची अ‍ॅन्डॉईड (Google Android Mobile Operating System) आणि त्यानंतर आयफोनची आयओएस (Apple iOS) ! आयफोन आयओएसवर चालते आणि हे सॉफ्टवेअर ते इतर कुणालाही देत नाहीत. ते केवळ आयफोनसाठीच बनविण्यात आले आहे.
त्याउलट अ‍ॅन्डॉईड सिस्टीम ही ओपन असून ती कोणत्याही मोबाईल उत्पादन कंपनीला सहज मिळविता येते. याच अ‍ॅन्डॉईड ऑपरेटींग सिस्टीमवर अधारीत मोबाईल स्वतः गूगल कंपनीच बनविते आणि ते विकते सुद्धा ही बाब अनेक भारतीय लोकांना माहितीही नसते. त्याचे कारण म्हणजे हे मोबाईल इतर अ‍ॅन्डॉईड मोबाईलच्या तुलनेत अत्यंत महागडे असतात आणि ते भारतात लॉन्च देखील अपवादानेच झाल्यासारखे होतात. पुर्वी गूगलने नेक्सस ही सिरीज आणली होती. त्यानंतर पिक्सेल ही सिरीज आणली असून ही सिरीज भन्नाट यशस्वी झाली आहे. याच सिरीजमधील गूगल पिक्सेल 6 (Google Pixel 6) आणि गूगल पिक्सेल 6 प्रो (Google Pixel 6 Pro) या दोन मॉडेलची दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी पॅसिफीक वेळेनुसार सकाळी 10 वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 च्या सुमारास घोषणा होणार आहेत.

दोन्ही मोबाईलमध्ये गूगलने सॅमसंगच्या मदतीन स्वतः विकसीत केलेली टेंसर (Google Tensor Chip Set) नावाची चीप वापरण्यात आली असून ही चीप आर्टिफीशीयल इंटेलीजन्ससाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामूळे हा मोबाईल इतर मोबाईलपेक्षा वेगळा राहणार आहे. शिवाय याच चीपमूळे, गुगलनेच जाहीर केल्यानुसार, हा मोबाईल गूगल किमान 4 वर्षे अपडेट करीत राहणार आहे. तसेच पुढील 5 वर्षे सेक्यूरीटी अपडेट मिळत राहणार आहेत. म्हणजेच एकदा मोबाईल घेतला की, त्याचे आयूष्य किमान 9 ते 10 राहणार आहे. त्यामूळे या मोबाईलचे हार्डवेअर सुद्धा त्याच तोडीचे राहणार यात काहीच वाद नाही. शिवाय आयफोनमध्ये असणारे सर्वच फिचर आणि आयफोनपेक्षा जास्त सुविधा गूगल देणार हे निश्चितच आहे. या दोन मोबाईलसोबतच अ‍ॅन्डॉईड 12 (Android 12 Operating System) ही मोबाईल ऑपरेटींग सिस्टीमही दाखल होणार आहे.
त्यामूळे जागतीक पातळीवर मोबाईल प्रेमी लोकांमध्ये आयफोन 13 व 13 प्रो पेक्षा (Apple iPhone 13 and 13 Pro) जास्त आज गूगलच्या मोबाईलची चर्चा होता आहे. या मोबाईलची दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी घोषणा होणार असून लवकरच बाजारात दाखल होणार आहे. अमेरिका, जपान सारख्या देशात हा मोबाईल लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल. मात्र भारतात हा मोबाईल कधी येनार हे मात्र अद्याप निश्चीत नाही. कारण गूगल पिक्सेल 4ए 5 जी (Google Pixel 4a 5g), गूगल पिक्सेल 5- 5 जी (Google Pixel 5 5g), गूगल पिक्सेल 5ए 5 जी (Google Pixel 5a 5g) सारखे मोबाईल भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले नाहीत. परंतू हे मोबाईल अ‍ॅमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवरून (Google Pixel on Amazon India website) सहज खरेदी करू शकता. तसेच गूगल पिक्सेल 6 आणि गूगल पिक्सेल 6 प्रो हे मोबाईलही खरेदी करता येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी गूगल या दोन्ही मोबाईलची किंमत अत्यंत आव्हानात्मक ठेवणार असल्याची प्राथमिक माहिती असून या किमतीमूळे आयफोन आणि सॅमसंग सारख्या कंपन्याना मोठाच धक्का बसणार आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने