Covid-19 Aid: कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांचा वारसांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान

हिंगोली: माननिय सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 30 जून, 2021 च्या आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी दि. 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे. हा निर्णय संपूर्ण भारतासाठी लागू असून महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने सानुग्रह अनुदान वाटप करण्यासाठी यंत्रणा उभी केली असून हा निधी संबंधित लाभार्थ्यांना मिळणार आहे.
त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांनी दि. 12 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या पत्रानुसार निर्देशित केल्यानुसार 50 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान वाटपासाठी ‘‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग), पहिला मजला, हिंगोली-431513, संपर्क क्रमांक 02456-222560, 9552932981, ई-मेल : rdc.hingoli123@gmail.com’’ हे सक्षम प्राधिकारी आहेत. Supreme Court Order On Financial Assistance of Rs. 50,000 To Kin Of Covid-19 Families. Maharastra government is setting up machinery to disburse the amount.

हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी, हिंगोली हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती लवकरच अधिसूचित करण्यात येईल. त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. इतर जिल्ह्यात त्या त्या जिह्याचे जिल्हाधिकारी हे प्रमुख असणार आहेत.

दलालांपासून सावधान; मिळणारा पैसा थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार....

कोरूना रोगामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी ही मदत ही एक सानुग्रह अनुदान आहे. असे असतानाही इतर योजनांप्रमाणे या योजनेतही आपले हात ओले करण्यासाठी दलाल मंडळी डोळे लावून बसली आहेत. अशा दलाल लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. ५० हजार पैकी १० हजार रुपये आम्हाला द्या, अर्ज करण्यासाठी, पाठपुरावा करण्यासाठी पैसा लागतो असे म्हणून हे दलाल पैसा लुबाडत असतात. त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. तसेच प्रशासनाने सुद्धा अशा दलालांच्या नादी न लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने