वारंगा येथे विद्युत तारेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

कळमनुरी: तालुक्यातील घोडा कामठा येथून डोंगरकडा येथे जाणाऱ्या ३३ के.व्हि. च्या लोंबकाळलेल्या ताराचे शॉक लागुन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना वारंगा फाटा येथे सोमवारी घडली.
याबाबत माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील शेतकरी मंगेश किसनराव कदम (वय ४९) शेतात जनावरांसाठी चारा घेऊन जात होते. त्यांच्या शेतातून घोडा कामठा येथून आलेल्या व डोंगरकडा येथील ३३ केव्ही उपकेंद्र येथे जाणा-या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा लोंबलेल्या आहेत. मंगेश कदम गवताचा भारा डोक्यावर घेताच त्यांना विद्युत धक्का लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

डोंगरकडा येथील शाखा अभियंता पी. डब्लु. जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सदरील घटनेची बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या