Sameer Wankhede समिर वानखेडे प्रकरण: या 'दी ग्रेट महारां'ची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी नव्हे काय?

हिंगोली/रावण धाबे: आयआरएस अधिकारी (IRS Officer Sameer Wankhede) आणि एनसीबी, मुंबई (NCB, Mumbai Zone) झोनचे प्रमूख समिर वानखेडे यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या टिका आणि आरोपानंतर राष्ट्रवादीचे कॉन्ग्रेस पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Maharashtra Cabinet Minister Nawab Malik) यांनी एक पुन्हा बॉम्बगोळा त्यांच्यावर टाकला आहे.
या टिकेला समिर वानखेडे यांनीही उत्तर दिले आहेच. परंतू नवाब मलिक यांचे आरोप नोकरीसाठी जात बदलण्याचा विषय असेल तर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. आणि वानखेडे कुटूंबियांनी एक व्यक्तिगत बाब म्हणून हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्विकारला असेल तर मग गंभीर नाही सुद्धा !

का होतेय, प्रकरणाची हॉट चर्चा?

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात केवळ एकच आरोपी नाही, तर या प्रकरणात तब्बल 8 आरोपी आहेत. त्यात बॉलीवूड नायक शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. आर्यन खान याच्याभोवती त्याच्या बापामूळे निर्माण झालेल्या वलयामूळे ही केस आर्यन खानमूळेच जास्त चर्चेत आली आहे. प्रकरण न्यायालयात असले तरी कारवाईतील प्रभाकर साळी नावाच्या एका पंचाने मोठाच आरोप केला आहे. 
हे प्रकरण कोट्यावधी रुपयांवर सेटल करण्यात येत होते आणि त्यातील मोठी रक्कम समिर वानखेडेंना मिळणार होती, असा आरोप होत आहे. एनसीबीने जानेवारी महिन्यात केलेल्या एका कारवाईत मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला अटक झाली होती. त्याला सप्टेंबर महिन्यात जामीन मिळाला. मंत्र्यांचा जावई अनेक महिने जेलची हवा खावून आला आणि त्याला जबाबदार एनसीबी, मुंबईचे समीर वानखेडे आणि त्यांची टीम असल्याने मंत्री नवाब मलीक वानखेडे यांच्यावर फैरी झाडत आहेत, असेही बोलले जात आहे. तर मुख़्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आदी नेतेही सुशांत सिंग प्रकरणापासून एनसीबी महाराष्ट्राची बदनामी करीत असल्याचा आरोप करीत पुढे येत आहेत. त्यामूळे या प्रकरणाची हॉट चर्चा होत आहे.

का काढली जात आहे, समीर वानखेडेंची जात?

जी जात नाही ती जात, ही काही जातीची व्याख्या केली जाते ती कमी शब्दात अत्यंत समर्पकच आहे. कारण, तुम्ही बौद्ध व्हा, ख्रिश्चन व्हा किंवा इस्लाम धार्मिक व्हा भारतात राहून केल्या काही जात पिच्छा सोडण्यासाठी तयार नसते. असेच काहीसे या प्रकरणात घडत आहे. समीर वानखेडे हे मागास असल्यामूळेच त्यांचेवर टिका करण्यात येत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 24 ऑक्टोबर रोजी केला होता. तर दि. 25 ऑक्टोबर रोजी मंत्री नवाब मलीक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्म नोंदीचा पुरावा त्यांचे ट्विटर खात्यावरून शेअर केला. या पुराव्यानुसार समीर वानखेडे यांचे पुर्ण नाव समीर दाऊद के. वानखेडे असे आहे. तर आईचे नाव झाहीदा बानो असे आहे.
परंतू या नोंदीनुसार, समीर वानखेडे यांच्या वडीलांच्या नावावर आळे करण्यात आले असून त्यावर स्टार मारून त्यातील दुरूस्ती त्याच प्रमाणपत्रावर आडव्या बाजूवर करण्यात आली आहे. या दुरूस्तीनुसार, समीर वानखेडे यांच्या वडीलांचे पुर्ण नाव, ज्ञानदेव कचरूजी वानखेडे असे करण्यात आले आहे. त्यांनी नोकरी मिळविण्यासाठीच केवळ जातीचा वापर केला का? आणि नोकरी लागली की आपली जात सोडून डॉ. शबाना कुरेशी या मुस्लीम महिलेशी निकाह केला का? असे प्रश्न प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष उपस्थित केले जात आहेत आणि वानखेडे यांना टार्गेट केले जात आहे. तर वानखेडे यांनी यावर स्पष्टीकरण देत आपली आई मुस्लीम तर वाडील हिंदू होते. आमचे कुटूंब बहुधर्मीय जे की खरे धर्मनिरपेक्ष असून त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे म्हटले आहे.
समीर वानखेडे यांची वंशावळ /महत्वाची कागदपत्रे (याच बातमीत जोडली आहेत)....

समीर वानखेडे यांचे मूळगाव, वरूड तोफा, ता. रिसोड, जि. वाशिम हे आहे. पुर्वी हे गाव अकोला जिल्ह्यात होते. आता जिल्हा वाशिम आहे. हे गाव सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथून जवळच असून गोरेगावपासून 10 ते 15 किमी अंतरावर आहे. जि.प. प्राथमिक मराठी शाळा, कोयाळी बु. येथून मिळविलेला दि. 18/09/2012 रोजीचा ज्ञानबा कचरू म्हणजेच ज्ञानदेव कचरू वानखेडे यांचा निर्गम उतारा. समीर वानखेडेच्या वडीलांचे 2008 मध्ये काढलेले ज्ञानदेव कचरूजी वानखेडे या नावाचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र. समीर वानखेडे यांच्या पणजोबांचे म्हणजेच कळन्या महार यांचे जन्म दिनांक (14/07/1921) नोंदीचे कोतवाली रजिस्टर नक्कल. आणि समीर वानखेडे यांच्या चुलत्यांचे म्हणजेच शंकरराव कचरूजी वानखेडे यांचे 14/10/1985 रोजी काढलेले कार्यकारी दंडाधिकारी, अकोला यांच्या कार्यालयाने दिलेले जातीचे प्रमाणपत्र. (Sammer Wankhede of NCB, Mumbai Zone hails from Warud Tofa village, in Risod Tehsil of Washim District in Maharashtra. Here are important documents regarding his family tree)

ही बाबासाहेबांशी मोठीच गद्दारी, निषेध करावा तेवढे कमीच.....

डॉ. बाबासाहेबांनी ज्यावेळी विषमतावादी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्विकाराला, त्यावेळी त्यांची अपेक्षा एवढीच होती, की दलित वर्गाला स्वाभिमानाने आपली मान उंचावता यावी (Dr. Babasaheb Ambedkar accepted Buddhism only for self-respect to the dalit community in India and not to take revenge against Hinduism) . युरोपातील हंगेरी सारखा देश असो की, काळ्या लोकांचा अफ्रीका, भारत असो की किंवा नेपाळ किंवा अमेरीका, कॅनडा, इंग्लंड अशा सर्वच ठिकाणी बाबासाहेबांचा बोलबाला आहे, तो यासाठी की त्यांनी स्वाभिमान शिकविला आहे. अन्यायाविरोधात बंड करण्याचे बाळकडू पाजले आहे. समीर वानखेडे प्रकरणाचा विचार केल्यास, या व्यक्तिने स्वतः ट्विटरवर जाहीर केले आहे, की त्याचा पहिला निकाह लग्न एका मुस्लीम महिलेशी झाला होता. असो, हा व्यक्तीगत प्रश्न आहे. बापाचेही नाव दाऊद ठेवले होते (की ते काही काळासाठी स्विकारले होते) हाही वादाचा विषय नाही. त्यांच्या बहिणीचे नावही यास्मीन आहे. तोही तिचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतू प्रश्न असा आहे की, तुम्ही मुस्लीम रितीरिवाज पाळता, आपली नावे इस्लाम धर्माप्रमाणे ठेवता आणि भासवता की आम्ही हिंदू आहोत. दुसरे लग्न हिंदू रिजावाप्रमाणे मंदिरात केले हे ही सांगता. आणि आपण हिंदूच आहोत, हे सुद्धा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष दाखवून देता. पत्नी क्रांती रेडकर सुद्धा लग्नाचे फोटो दाखवून तेच ठासून सांगत आहे. (Sameer Wankhede is an example of treachery towards Dr. Babasaheb Ambedkar. Babasaheb Ambedkar taught self-respect and expected helping hand from the educated people to uplift the downtrodden community.)
मिळालेल्या कागदपत्रानुसार, तुम्ही हिंदू महार आहात, अनुसुचित जातीचे आहात. जातीचा आधार घेवून नोकरी मिळविली तर मग जात का सांगत नाहीत? असा प्रश्न आज संपुर्ण महाराष्ट्राला पडला आहे. महार जातीचे आहोत हे सांगण्याऐवजी हिंदू सांगणे अधिक अभिमानाचे वाटते. ज्या जातीत जन्मलो त्या जातीचा उद्धार करणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य असावे, अशी बाबासाहेबांनी अपेक्षा व्यक्त केली होती. याठिकाणी या उच्चशिक्षीत आयआरएस अधिकार्‍याला जात सांगायची लाज वाटत असेल तर त्याच्याकडून समाजाचा उद्धार करणे तर कोसो दूर राहिले. वेळेनुसार आपली जात, आपला धर्म बदलणारी ही औलाद रंग बदलणारा एक सरडाच आहे. मुस्लिम व्यक्तीने तक्रार केली म्हणून दाऊदचा ज्ञानदेव, आणि हिंदूंनी काही केले की पुन्हा ज्ञानदेवचा दाऊद. आणि दोघेही विरोधात गेले की मग दलीत व्हायला काहीही लाज वाटणार नाही. आम्ही पण बौद्धच आहोत, बाबासाहेबांना मानणारे आहोत हेही सांगायला मागे राहणार नाहीत. काही केल्या नीचापणा, महारकी सोडायला तयार नसलेल्या समाजातील असल्या 'दी ग्रेट महार' लोकांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी गद्दारी नव्हे का, असाच प्रश्न आज महाराष्ट्राला पडला आहे. स्वार्थ साधण्यासाठी बाबासाहेबांचे संविधान आणि काम संपले की मनुचे विधान, असला काही प्रकार चालू आहे त्याचा करावा तेवढा निषेध कमीच !

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

2 टिप्पण्या

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

  1. अतिशय समर्पक शब्दामध्ये समिर वानखेडे यांचा बोध आपण घेतलेला आहे . स्वतःच्या स्वार्थासाठी योग्य वेळी जात दाखविने आणी जात लपविणे भारता मध्ये नवीन बाब नाही . मोठ्या उच्च पदावर नोकरी करणाऱ्या लोकांच्याच बाबतीत असे घडतांना जास्त दिसते. हे फक्त सर्वच जातीतील लोकांची दिशाभूल करतात . कोणताही धर्म स्विकारावा ही वैयक्तीक बाब आहे त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये परंतू जातीचा आधार घेवून असे चाणाक्ष माणसं वाटेल तेव्हा जनतेची दिशाभूल करतात . असे माणसं धर्मनिरपेक्ष नसून सर्वच धर्माशी गद्दारी करून ऐश आरामात जीवन जगतात . भारतीय संविधानानुसार धर्मनिरपेक्ष दाखविण्यासाठी जात किंवा धर्म बदलावा लागत नाही . परिवर्तनवादी विचार आत्मसात केले तर समिर वानखेडे सारखे सोंग करण्याचे काम पडत नाही .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हे जात प्रकरण आधीपासूनच आहे मग याची चर्चा आता का यापूर्वीच हा प्रकार उघड व्हायला हवा होता.

      हटवा
थोडे नवीन जरा जुने