हिंगोली: हिंगोली शहरात गांधी चौकातील साई लॉजमध्ये नव्यानेच दीक्षा घेतलेल्या एका बौद्ध भिक्खूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गुनानंद धम्मरत्न असे या भिक्खूचे नाव असून २०१९ मध्ये त्याने आजीवन भिक्खू दीक्षा घेतली होती.
अनिल गोविंद तायडे रा. किनगाव, ता. यावल जि. जळगाव असे या भिक्खूचे मूळ नाव आहे. सदर भिक्खुने ६ मे २०१९ रोजी भिक्खू संघाची दीक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांनी आजीवन धर्मप्रसाराचे कार्य सुरू करण्याच्या हेतूने घर सोडले. त्यातच त्यांचा आज मृतदेह आढळून आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु ज्या रुममध्ये ते थांबले होते ठिकाणी देशी दारूच्या बाटल्या आणि गुटख्याच्या पुड्या सापडल्या आहेत. दारूच्या नशेत त्यांनी गळफास घेतला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
पोलीस त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी एका महिलेची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील महिला कोण, तिचा आणि भंतेचा काय संबंध याचा उलगडा होणार आहे. त्यामुळे आत्महत्या केली की, आत्महत्या करण्यास भाग पाडले याचाही तपास होणे गरजेचे आहे.
घटनास्थळी एपिआय अनिल काचमांडे, पोलिस उपनिरीक्षक गंगाधर बनसोडे, पोलीस जमादार शेख शकील, राजू जाधव, जमादार पाचपुते आदींनी भेट दिली.
1 टिप्पण्या
महाडेमोक्रॅट बातम्यांसाठी चांगले स्थळ आहे.
उत्तर द्याहटवाWe received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe