राजू वाठ यांच्यासह कार्यकर्त्यांचा आझाद समाज पार्टीत प्रवेश

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील धडाडीचे नेते राजू वाठ यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह आज आझाद समाज पार्टीत प्रवेश केला.
हिंगोली येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात वंचीत आघाडीचे जिल्हा सचिव  राजू वाठ यांच्यासह सुनील खंदारे, वसंत मुधळकर यांनी प्रवेश घेतला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सचिन पट्टेबहादुर, जिल्हाप्रमुख ॲड. रावण धाबे, जिल्हा महासचिव ॲड. अभिजत खंदारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

सूत्रसंचालन ॲड. खंदारे यांनी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सचिन पट्टेबहादुर यांनी आझाद समाज पार्टीच बहुजन समाजाचे काम करणारी पार्टी असल्याचे सांगितले. तर जिल्हाप्रमुख ॲड. धाबे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून महापुरुषांना अपेक्षित काम करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलतांना राजू वाठ यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात औंढा नागनाथ तालुक्यात आझाद समाज पार्टीचे काम जोमाने वाढवून बहुजन समाज जोडण्याचे कार्य केले जाईल. लवकरच औंढा नागनाथ येथे बैठक घेऊन पुढील कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या