खंडाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

हिंगोली: आडगाव सर्कल मधील मौजे खंडाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्राम शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. 
यावेळी कार्यक्रमाचे सुरुवात गावांमधून बँड पथकासह रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नंतर संपूर्ण गावांमध्ये रॅली काढून गावातील मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन सोबतच गणपतीचे दर्शन घेऊन प्रचंड उत्साहाने खंडाळा येथे हजारो वंचितचे समर्थक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यानंतर सर्व सन्माननीय जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या नाम फलकाचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. 

यानंतर कार्यक्रमात बोलताना जिल्हा महासचिव रवींद्र वाढे असे मनोगत व्यक्त केले की आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक वंचित बहुजन आघाडी इथल्या वंचित समूहांना राजकीय सत्तेपर्यंत पोहोचवून लोकशाहीचे खरे सामाजीकरण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यानंतर कार्यक्रमात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव ज्योती पाल रणवीर यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार असा ठाम निर्धार आडगाव सर्कल मधील संपूर्ण मतदार बंधू-भगिनींना सांगितला. यावेळी महीला आघाडीच्या नेत्या फॉरेन रिटर्न डिग्रस वाणीच्या सरपंच डॉ . चीञाताई कुर्हे यानीही मनोगत व्यक्त केले. 

तसेच डॉ. अनील कुर्हे यांनी बाबासाहेब आणी बाळासाहेब यांचा संघर्ष सांगितला. शेख अतीखुर रहेमान शहर अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमास जिल्हा नेते विनोद विनोद राव नाईक, जिल्हा नेते दूल्हे का पठाण, जिल्हा नेते डॉक्टर दीपक डोणेकर, जिल्हा नेते राम पाटील, युवा नेते योगेश भाऊ नरवाडे, प्रसिद्धी प्रमुख बबनमामा भुक्तर, गोरेगावचे युवा नेते अरुण भाऊ गिरे, सेनगाव तालुका महासचिव यशपाल खांदळे, सेनगाव तालुका संघटक धम्मदीप सरकटे, हिंगोली तालुका प्रसिद्धी प्रमुख संघपाल कांबळे, सेनगाव तालुका प्रवक्ते प्रवीण मोरे, दीपक पाईकराव, नितीन ढेंगळे, नितेश झुंजार, सिरसमचे अरुणभाऊ कांबळे, आजीज भाई, देवठाणा शाखा अध्यक्ष प्रसंजीत धवसे, युवा नेते माधव खंदारे, युवा नेते गणेशराव पडघान पाटील, भीमराव सूर्यतळ, शंकर पोघे, आदिसह खंडाळा शाखेचे अध्यक्ष कनिष्क कांबळे, उपाध्यक्ष देवानंद साठे, सचिव अजय नेतने, सहसचिव विशाल कांबळे, कोषाध्यक्ष विशाल कांबळे, सल्लागार आकाश साठे, सरचिटणीस विनोद अंभोरे, सल्लागार केशव नेतने आदिसह आडगाव सर्कल मधील कार्यकर्ते व खंडाळा येथील खंडाळा येथील ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या