भीम आर्मीमुळे बोरगावकरांना मिळाली स्मशानभूमी

वसमत: बोरगाव (बू) येथील सार्वजनिक स्मशानभूमी प्रकरणात भीम आर्मीच्या लढ्याल अखेर यश मिळाले असून येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी जागा मिळाली आहे. गेल्या ४० वर्षांपासून या गावातील ग्रामस्थांचा संघर्ष चालू होता. आता हा संघर्ष संपला असून ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत. 
मौजे बोरगांव (बू) तालुका वसमत या गावचे सन 1977-78 हया वर्षी शासनाने पुनर्वसन गट क्रमांक 31 ज्याचा जूना सर्व्हे नंबर 6 पैकी 5 एकर जागेमध्ये केले होते. परंतु त्या ठिकाणी अद्याप स्मशाभूमीसाठी उपाय योजना करण्यात आली नव्हती त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतच्या मालकीची जमीन आहे ते लोक आपल्या मालकी जागेवर अंत्यविधी करत होते. पण जे गोरगरीब भूमिहीन रोजंदारी वर्ग आहे त्यांना नाईलाजास्तव मुळ गावच्या स्मशाभूमीवरच दोन ते अडीच किलमीटर अंतरावर पांदन रस्त्यावरून चिखल तुडवत जाऊन अंत्यविधी करावा लागत असे. सदरील स्मशाभूमीकडे जाण्यासाठी नदीपात्र ओलांडून जावे लागत असे पावसाळयात नदील नेहमीच चार ते पाच फूट पाणी वाहत असल्यामुळे गोरगरिबांना अंत्यविधी करण्यासाठी अनंत अडचणीचा आजही सामना करावा लागत होता.

दिनांक 23/07/2021 रोजी केशव शिवराम वाघमारे यांच्या मृत्यू झाला होता. त्यादिवशी सततधार पाऊस चालू असल्यामुळे स्मशाभूमीत अंत्यविधी करण्यासाठी प्रेत घेऊन जाता येत नव्हते अंत्यविधी करण्यासाठी इतरत्र कुठेही पर्याय जागा उपलब्ध झाली नाही त्यामुळे नाईलाजासत्व पोलीसप्रशासन व महसूल प्रशासन यांच्या संरक्षनात वसमत ते किन्होळा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अंत्यविधी करावा लागला होता. याबाबत दिनांक 26/07/2021रोजी तहसील कार्यालयात निवेदन सादर केले होते त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी गिरगाव यांनी 05/08/2021रोजी प्रत्यक्ष पंचनामा केला आहे. त्यामध्ये नमूद केल्या प्रमाने गट क्रमांक 31पैकी नविन गावठाण मधिल 10 ते 12 प्लॉट जमीन रिकामी आहे त्या ठिकाणची 8 गुंठे जमीन सार्वजनिक स्मशनभूमी करिता अधिकृतरीत्या सातबारावर नोंद करून आपल्या मार्फत मोजणी करावी जेणेकरून भविष्यात गावातील गोरगरीब नागरिकांना भविष्यात अंत्यविधीसाठी सोईचे होईल अन्यथा नाईलाजास्तव ग्रामपंचायत कार्यालया समोर अंत्यविधी करण्याची वेळ आल्यास प्रशासनान जबाबदार असेल. स्मशाभूमीचा प्रश्न तात्काळ मार्गी लाऊन 8 गुंठे जमीनीची सात बारावर नोंद करून अधिकृत मोजणी करून द्यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्गाचा अवलंब करावा लागेल अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली होती.

काल दिनांक 03/09/2021 रोजी वामन आझादे हे काल मयत झाले होते त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी वसमत तालुक्याचे तहसिलदार मा.श्री.अरविंद बोळंगे साहेबांनी याबाबत तात्काळ उपाययोजना करून मंडळ अधिकारी श्री काळे साहेब यांनी आज सकाळी बोरगाव येथे जाऊन गावातील सर्व जाती धर्माच्या प्रतिष्ठित नागरिकासोबत चर्चा करून अंत्यविधीसाठी नवीन गावठाण मधील जमिन तात्काळ ऊपलब्ध करून देऊन न्याय दिला तसेच वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मा.विलास चवळी साहेबांनी मोलाचे सहकार्य केले अंत्यविधी प्रसंगी भीम आर्मीचे मराठवाडा सचिव तथा जिल्हा प्रमुख आनंद खरे, जिल्हा सचिव प्रदीप मस्के, तालुका महासचिव किशन खरे, तालुका मार्गदर्शक रवी कुंटे, वसमत शहर प्रमुख शेख साजिद भाई राजकुमार वाघमारे, दशरथ गायकवाड व इतर समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या