चांगले स्पेसिफिकेशन, फीचर्स, कमी किंमत, फायनान्स सुविधेसह मिळणारा रिलायन्स जिओचा जिओ नेक्स्ट (Reliance Jio Next- the most and ultra affordable Mobile phone) 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा मोबाईल फोन सर्वात स्वस्त 4 जी स्मार्टफोन ठरणार असून सामान्यपणे वापरण्यासाठी हा एक उत्तम मोबाईल ठरण्याची शक्यता आहे. अत्यंत परवडणाऱ्या या स्मार्टफोनची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 2021 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) केली होती. जिओफोन नेक्स्ट गुगलच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. एकदा लॉन्च झाल्यानंतर, हा भारतातील किंवा अगदी जागतिक स्तरावरील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे High Lights of the JioPhone NEXT, वैशिष्ट्ये Specifications
जिओफोन नेक्स्टमध्ये 5.5-इंच एचडी+ डिस्प्ले असेल. मोबाईल Android 11 Go Edition वर चालेल. या स्मार्टफोनमध्ये सिंगल-लेन्स 13-मेगापिक्सलचा प्राइमरी रिअर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा असेल. मोबाईलमध्ये 5.5-इंच एचडी+ डिस्प्ले 720x1,440 पिक्सेल रिझोल्यूशन असेल. मा मोबाईल स्नॅपड्रॅगन 215 एसओसीवर चालणारा असण्याची शक्यता आहे आणि हा मोबाईल गुगल सोबत (Google) भागीदारी करून विकसित केला गेला असल्याने या मोबाईलला सॉफ्टवेअर सपोर्ट सुद्धा अनेक वर्षे असण्याची शक्यता आहे. 2 आणि 3 जीबी रॅम आणि 32, 64 जीबी ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडले जाऊ शकते. जिओफोन नेक्स्टमध्ये 2500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. फोन भारतीय वापरकर्त्यांसाठी काही अनुकूलित आणि गुगल अॅसीस्ट्न्ट सारख्या अद्वितीय वैशिष्ट्यांसह येईल. या स्मार्टफोनमध्ये रिअल-टाइम भाषांतर सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
Price and Financing किंमत आणि वित्त पर्याय
जिओफोन नेक्स्टची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही. जिओ कंपनीने म्हटले आहे, की जिओफोन नेक्स्ट हा जगातील सर्वात स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन असेल. त्यामूळे मोबाईल एक्सपर्टच्या माहितीनुसार, जिओफोन नेक्स्टचे 2 मॉडेल असतील. एक बेसीक जिओफोन नेक्स्ट असेल, ज्याची किंमत 5000 रुपयेच्या आसपास असेल आणि दुसरा एक जिओफोन नेक्स्ट अॅडव्हान्स असेल, ज्याची किंमत 7,000 रुपयेच्या आसपास असणार आहे.
रिलायन्स जिओ अनेक भारतीय बँका आणि कर्ज देणाऱ्या भागीदारांसोबत भागीदारी करून हा मोबाईल विकणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट, अॅश्योर आणि डीएमआय फायनान्स यासारख्या बँका व वित्त पुरवठा करणार्या संस्था असून त्यामूळे या मोबाईलची किमत कमी होणार आहे, तसेच ग्राहक फक्त 10% किंमतीसाठी फोन बुक करू शकतील..