औंढा न्यायालयात लोक न्यायालयाचे 25 सप्टेंबरला आयोजन

औंढा नागनाथ: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समीती औंढा नाग, व वकिल संघ औंढा ना. यांच्या संयुक्त विद्यमाने औंढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकन्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने व परस्पर संमतीने केसचा झटपट निकाल लागतो, तोंडी पुरावा-उलटतपास यांची गरज भासत नाही, लोकन्यायालयातील निवाड्याविरुध्द अपील करता येत नाही तेथेच केस संपते, सहमतीने वाद मिटविल्याने दोन्ही बाजुचा विजय होतो, हार जित याचा प्रश्न उत्पन्न होत नाही, एकमेकांत द्वेष वाढत नाही, वेळ आणि पैसा यांची बचत होते, साधता संवाद संपतील वाद या उक्तीप्रमाने वाद संपुष्टात येऊन चांगले संबध प्रस्थापित होण्यास मदत होते. सदर लोक न्यायालयात फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, दिवानी-कौटुंबीक वादाची प्रकरणे, बँकेची, महावितरणची प्रकरणे, नगरपंचायत, ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे दाखल व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

तरी औंढा तालुक्यातील पक्षकारांनी आपली तडजोडपात्र प्रकरणे आपसात तडजोडीद्वारे मिटवण्यासाठी 25 सप्टेंबर च्या लोक न्यायालयात औंढा न्यायालयात हजर राहुन सदर लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका विधी सेवा समिती औंढा नाग , वकिल संघ औंढा नागनाथ यांनी केले आहे. त्यासाठी संबंधित पक्षकारांनी 25 सप्टेंबर पुर्वी न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज देऊन लोकन्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी अर्ज करावा. मागील लोकन्यायालयात तब्बल 66 प्रकरणात तडजोड होऊन ,थकित कर्ज रक्कमांची 39 लाखांच्यावर तडजोडीने प्रकरणे निकाली निघाली होती.त्यामुळे यावेळीही या लोकन्यायालयात अधिकाधिक पक्षकारांनी शारीरिक अंतर पाळत, मास्क चा वापर करुन प्रकरणे मिटविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन तालुका विधी सेवा समिति औंढा नागनाथ, व वकिल संघ औंढा नागनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या