औरंगाबाद विभागातील सर्वसाधारण संवर्गातील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या
हिंगोली/बिभीषण जोशी: औरंगाबाद विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने उशिराने काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील दोन उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत.
उपायुक्त समाजकल्याण: उमेश सोनवणे यांच्याकडे हिंगोलीचा पदभारहिंगोली - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाने समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्या आस्थापनेवरील गट अ संवर्गातील आठ अधिकाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय कारणावरून बदल्याचे आदेश ५ ऑगस्ट रोजी काढले आहेत.त्यामुळे हिंगोली येथे उमेश सोनवणे यांचा रूपाने कायमस्वरूपी अधिकारी मिळाल्याने कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.हिंगोली येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पदाचा पदभार मुंबई येथील उमेश देवराव सोनवणे यांच्याकडे सोपविला आहे.त्याचप्रमाणे जालना येथील कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता मकरंद यांना बीड येथे पद स्थापना देण्यात आली तर विशाल नाईक यांची रायगड वरून पालघर तर राजेश पांडे यांना गडचिरोली येथून भंडारा येथे नियुक्ती देण्यात आली. व्ही.एस.साळवे यांची अमरावतीहुन उस्मानाबाद येथे तर व्ही. डी. राठोड यांची लातूर हून यवतमाळ येथे बदली झाली. श्रीमती व्ही. बी. बरगे यांची जळगाव हून रत्नागिरी येथे मूळ पदावर बदली करण्यात आली. हिंगोली येथे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाला कायमस्वरूपी उपायुक्त मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिकांना लागली आहे. आतापर्यन्त जात पडताळणी प्रमाणपत्र विभागाला प्रभारीवरच कामकाज करण्याची वेळ आली होती. आता मात्र नवीन अधिकारी मिळाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
ज्या अधिकाऱ्यांचा तीन वर्षापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी गेला अश्या बदली पात्र सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्या करण्यात आल्या. यामध्ये हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे मूळ पदावर बदली करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त जागी परभणी जिल्ह्यातील सेलू येथील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांची नियुक्ती केली आहे. तसेच कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांची कोल्हापूर येथे रोहयोच्या उपजिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली. तर येथील निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना कार्यरत पदावर २०२१-२२ पर्यन्त मुदत वाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी शासनाने जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी यांच्या बदल्या झाल्या ,आता त्यापाठोपाठ उपजिल्हाधिकारी संवर्गातील बदल्याचे आदेश काढले आहेत. यापाठोपाठ पोलीस दलातीलही डीवायएसपी पदांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे १५ ऑगस्ट पर्यन्त विविध विभागातील बदल्या करणे शासनाला अपेक्षित आहे. त्यामुळे एकापाठोपाठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे.