लाचखोर प्राचार्य दिलीप राठोड एसीबीच्या जाळ्यात

हिंगोली/ बिभीषण जोशी: जात पडताळणी प्रस्ताव माझ्यामार्फत पाठवून भाचाची व मुलीची जात पडताळणी करण्यासाठी माझ्या ओळखीने जात प्रमाणपत्र मिळवून देतो म्हणून एका प्रचार्याला दोन हजाराची लाच घेताना शुक्रवारी (ता.१३) ऑगस्ट लाच लुचपत विभागाने लाचखोर प्रचार्याला रंगेहात पकडल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील महाकाली माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालय येथील प्राचार्य दिलीपकुमार विठ्ठल राठोड यांनी तक्रादार यांच्या भाची व मुलीची जात पडताळणी करण्याचे असल्याने प्रचार्याला भेटल्यानंतर त्यांनी या कामासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली.

त्यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत विभागाकडे लाच मगितल्याची फिर्याद दिली त्यावरून( ता.१२ )रोजी या घटनेची पडताळणी करण्यात आली. असता, ता.१३ ऑगस्ट रोजी लाच लुचपत विभागाने सापळा रचला असता, महाकाली शाळेजवळ एका खाजगी हनुमान गोरखनाथ रवने माऊली कृपा मेडिकल मध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना सायंकाळी पावणे पाच वाजता एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून प्राचार्य दिलीप विठ्ठल राठोड या लाचखोर प्राचार्यास अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक निलेश सुरडकर यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर , अर्चना पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निलेश सुरडकर ,विजय उपरे, तान्हाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंगे , अवी कीर्तनकार, सरनाईक या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या