वसमत: स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष भाई ॲड चन्द्रशेखर आजाद, राष्ट्रिय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह, राष्ट्रिय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी दत्तूजी मेढे, राष्ट्रिय सदस्य तथा गुजरात प्रभारी अशोकजी कांबळे, राज्य प्रमूख सितारामजि गांगावणे यांच्या नेतृत्वात सामजिक, शैक्षणीक, राजकिय क्षेत्रात जोमाने काम करत असलेल्या भीम आर्मी भारत एकता मिशन या सामजिक संघटनेत भीम आर्मीचे मराठवाडा सचिव तथा जिल्हा प्रमुख हिंगोली आनंद खरे, यांच्या मार्गदर्शनाखाली आज वसमत शहरातील मोठ्या संख्येने युवकांनी जाहीर प्रवेश केला.
त्यामध्ये शेख साजिद शेख इस्माईल यांची वसमत शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर विद्यार्थी विंगच्या तालुका अध्यक्ष किरण कोल्हे यांची पदी निवड करण्यात आली तसेच मोहम्मद हाशम खान, रहेमान चाऊस, शेख यासीन, काजी फरहान, शेख इर्शाद, शेख आखिल, शेख फारुखभाई, सय्यद बबलू, सोहेल पटेल, दानिस पटेल, शेख आवेश, इम्रान खान, सालेद उस्ताद, रहेमान चाऊस, साबेर चाउस, शेख दिशांत, शेख शारुख, शेख सलमान, शेख अस्लम, शेख काजिम, शेख रिजवान, शेख अफरोज, अमीर पठाण, शेख अजहर, शेख हुसेन, शेख हसम, शेख अजू भाई, शेख शाय्यद, शेख इर्शाद भाई यांचा जाहीर प्रवेश करन्यात आला. त्यावेळी प्रमूख पाहुणे एमआयएमचे शहर प्रमुख हाशम भाई, पत्रकार बाबा पठाण, सामजिक कार्यकर्ते प्रा प्रदीप मस्के भीम आर्मीचे तालुका प्रमुख निवृत्ती धेंबरे, ता.शो.मी प्रमुख हर्षदआजादे , उप प्रमूख सुनील थोरात, संघटक संदिप गायकवाड , सचिव राहुल गायकवाड, महासचिव किशन खरे, मार्गदर्शक रवी कुंटे, गिरगाव सर्कल प्रमूख अविनाश दवणे, कौठा सर्कल प्रमूख विशाल कांबळे, मरसुळ शाखा प्रमुख संजय खंदारे तसेच वसमत शहर कार्यकारणीचे शुभम कांबळे, शिवा बळवंते, बंटी वाहूळे, शंकर कोरडे, सुमेध सरतापे, कपिल गायकवाड व इतर विविध क्षेत्रातील सामजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.