वसमत/अनिल शितोळे: तालुक्यातील पळशी येथील आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी मान्यता देवून सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात याव्यात अशी मागणी, डॉ. अजय मुंदडा यांनी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील पळशी येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटून सुद्धा अध्याप वैद्यकीय सेवा उपलब्ध झालेली नाही यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला गर्भवती माता यांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे ही अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर आरोग्य उपकेंद्र आस्मानी त्या देऊन वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करून घ्यावी आणि नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावी ही विनंती जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर डॉक्टर अजय मुंदडा, जे. टी. बेंडे यांचा स्वाक्षर्या आहेत.